जेडीयू-आरजेडीच्या नात्यात अविश्वासाची दरी निर्माण झाली असल्याचेही म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनी पुन्हा एकदा महाआघाडीच्या सरकारबाबत मोठं विधान केलं आहे. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर मोठा आरोपही केला आहे. आरजेडीचे एमएलसी सुनील कुमार सिंह आणि मुख्यमंत्री नितीश यांच्यातील ताज्या वादाबाबत सुशील मोदी म्हणाले की, आता जेडीयू-आरजेडीच्या नात्यात अविश्वासाची दरी निर्माण झाली आहे. Bihar Politics Sushil Kumar Modi expressed suspicion that Nitish Kumar is tapping the MLAs phone
याचबरोबर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर मोठा आरोप करताना सुशील मोदी म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्यांकडून आमदारांचे फोन टॅप केले जात असल्याचे दिसत आहे. कोण कोणाच्या संपर्कात आहे आणि कोणाचे काय झाले आहे, हे मुख्यमंत्र्यांना माहीत असेल, तर शक्यता आहे की आमदारांचे फोन टॅप केले जात आहेत आणि गुप्तचर विभागाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवली जात असल्याचे दिसत आहे’.
याशिवाय, जेडीयूचे अनेक आमदार आणि खासदार भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा सुशील कुमार मोदी यांनी केला आहे. भाजपा नेत्याच्या या दाव्यामुळे जेडीयूमध्ये फूट पडल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
यासोबत सुशील मोदी म्हणाले की, आता जेडीयूमध्ये पळापळ होईल, पण नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण गृहमंत्री अमित शाह यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. नितीश कुमार यांनी काहीही केले तरी त्यांना एनडीएमध्ये परत येणार नाही. बिहारमध्ये बंडखोरीची परिस्थिती निर्माण होत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गेल्या 17 वर्षांत एकाही आमदार किंवा खासदाराला भेटण्यासाठी एक मिनिटाचाही वेळ दिलेला नाही. खासदारांना वाट पहावी लागायची, आता ते प्रत्येक आमदाराला अर्धा तास वेळ देत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App