‘’नितीश कुमारांसाठी आता भाजपाचे दरवाजे कायमचे बंद.’’ असंही यावेळी शाह म्हणाले.
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहामधील नवदा येथे आज (रविवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका सभेत बोलताना म्हटले की, ‘’आम्ही जनतेत जाऊ आणि महाआघाडीचे सरकार उखडून टाकू. नितीश कुमार काही पंतप्रधान होऊ शकत नाहीत, कारण देशाच्या जनतेने ठरवले आहे की तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. Bihar: Now BJP’s doors are closed forever for Nitish Kumar Amit Shah
याशिवाय ‘’आता नितीश कुमार यांना परत सोबत घेतले जाऊ नये, हेच जनतेचे मत आहे. त्यांनी सांगतले की ‘’लोकसभा निवडणुकीनंतर हे बिहार सरकार पडणार आहे आणि भाजपाचे सरकार येणार आहे. तुम्ही ४० पैकी ४० जागा द्या, दंगा करणाऱ्यांना उलट लटकावून वठणवीर आणू.’’ असंही अमित शाह यांनी सांगितलं.
अमित शाह म्हणाले, “बिहारच्या जनतेने ठरवले आहे की सर्व 40 (लोकसभा) जागांवर मोदीजींचे कमळ फुलणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर भाजप जेडीयूला पुन्हा एनडीएमध्ये घेईल याबद्दल कोणाला शंका असेल तर मी हे स्पष्ट करू इच्छितो की भाजपचे दरवाजे त्यांच्यासाठी (जेडीयू) कायमचे बंद आहेत.’’
आज बिहार के अनेक इलाकों में आग लग रही है, समग्र बिहार की जनता चिंता में है। 2024 में मोदी जी को पूर्ण बहुमत दीजिए और 2025 में बिहार में भाजपा की सरकार बनाइए… इन दंगा करने वालों को भाजपा की सरकार उल्टा लटकाकर सीधा करेगी: गृह मंत्री श्री @AmitShah https://t.co/Z1Ski7aOMI — Office of Amit Shah (@AmitShahOffice) April 2, 2023
आज बिहार के अनेक इलाकों में आग लग रही है, समग्र बिहार की जनता चिंता में है।
2024 में मोदी जी को पूर्ण बहुमत दीजिए और 2025 में बिहार में भाजपा की सरकार बनाइए… इन दंगा करने वालों को भाजपा की सरकार उल्टा लटकाकर सीधा करेगी: गृह मंत्री श्री @AmitShah https://t.co/Z1Ski7aOMI
— Office of Amit Shah (@AmitShahOffice) April 2, 2023
याचबरोबर ते म्हणाले की, “जंगलराजचे लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाचे सरकार आहे, ते सरकार बिहारमध्ये शांतता प्रस्थापित करू शकेल का? सत्तेची भूक लागल्याने नितीशकुमार लालूप्रसाद यादवांच्या मांडीवर बसले, आम्ही ‘महागठबंधन’ सरकार करू उखडून टाकू.” असंही शाह यांनी सांगितलं.
तसेच नवादा येथील रॅलीत केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले की, ‘’मला सासारामला जायचे होते पण दुर्दैवी परिस्थितीमुळे तिथे लोक मारले जात आहेत, गोळ्या झाडल्या जात आहेत आणि अश्रूधुराचे नळकांडे सोडले जात आहेत. माझ्या पुढच्या भेटीत मी नक्कीच सासारामला येईन.’’ असं यावेळी अमित शाह यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App