‘ED’च्या ताब्यात सर्वात मोठा घोटाळेबाज ; दहा राज्यांमध्ये २७ बायका अन् १३ बँकांची फसवणूक!

Ramesh Swain

या बदमाशाने फसवणूक केलेल्या महिलांच्या यादीत मोठ्या पदांवरील अनेक महिला आहेत.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत एक अशी व्यक्ती समोर आली आहे, ज्याच्या कृत्याने कोणालाही धक्का  बसले. ओडिशाचा सर्वात मोठा घोटाळबाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. रमेश स्वेन उर्फ ​​बिभू प्रकाश स्वेन नावाच्या या बदमाशाचे कारनामे ऐकून कोणीही चक्रावून जाईल. या मास्टरमाइंडला ईडीने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. या महाशयास दहा राज्यात २७ बायका आहेत. लग्नाच्या जाळ्यात अडकवून त्याने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. या व्यक्तीचा इतिहास तपासला असता धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. Biggest scammer in custody of ED 13 bank frauds and 27 wives in 10 states

२०११मध्ये स्वेनला हैदराबादच्या लोकांनी त्यांच्या मुलांना एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी २ कोटींहून अधिक रुपये उकळल्याप्रकरणी पकडे होते. एवढेच नाही तर याआधी २००६ मध्ये या व्यक्तीने केरळमधील १३ बँकांनाही लुबाडलं होतं. या बँकांची १२८ बनावट क्रेडिट कार्डद्वारे एक कोटींची फसवणूक करण्यात आली..

ओडिशा पोलिसांचे एक पथक आठ महिन्यांपासून स्वेनवर लक्ष ठेवून होते. यानंतर पोलिसांनी त्याला १३ फेब्रुवारीला पकडले. मे 2021 मध्ये दिल्लीत राहणाऱ्या स्वेनच्या पत्नीने पोलिसांत तक्रार देऊन त्याची फसवणूक उघडकीस आणली होती. या महिलेने २०१८ मध्ये स्वेनसोबत लग्न केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वेनने भुवनेश्वरमध्ये तीन अपार्टमेंट भाड्याने घेतले होते. तीनही अपार्टमेंटमध्ये त्याने आपल्या तीन बायका ठेवल्या होत्या. स्वेनच्या पत्नींनी सांगितले की, तो त्याच्या इतर पत्नींकडून बँक खाती गोठवली असल्याच्या बहाण्याने पैसे घेत असे. यानंतर तो नवीन महिला शोधत होता. या बदमाशाने फसवणूक केलेल्या महिलांच्या यादीत मोठ्या पदांवरील अनेक महिला आहेत. यामध्ये आयटीबीपीचा एक असिस्टंट कमांडंट, आसामच्या एक डॉक्टर, छत्तीसगडच्या चार्टर्ड अकाउंटंट आदींचा समावेश आहे.

Biggest scammer in custody of ED 13 bank frauds and 27 wives in 10 states

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात