भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने उचललं ‘हे’ मोठे पाऊल!

 बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) च्या महासंचालकांनी दिली आहे माहिती

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  गेल्या काही वर्षांपासून भारत आणि चीनमधील संबंध खराब आहेत. वादाचे खरे कारण म्हणजे 3440 किमी लांबीची सीमा. याबाबत दोन्ही देश आपापले दावे करत आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) दोन्ही देशांच्या लष्कराच्या सैनिकांमध्ये चकमक सुरू आहे. दरम्यान, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) च्या महासंचालकांनी सांगितले की, केंद्रातील मोदी सरकारने भारत-चीन सीमेवर आतापर्यंत कोणती व्यवस्था केली आहे. big step taken by the Modi government in the background of India China border dispute

बीआरओचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांनी चंदीगडमधील हिमांक एअर डिस्पॅच युनिटला भेट दिली. जगातील सर्वात मोठ्या थ्रीडी काँक्रीट प्रिंटेड कॉम्प्लेक्सच्या बांधकामाची  त्यांनी पाहणी केली. यानंतर ते म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत भारत-चीन सीमेवर बीआरओ आणि इतर एजन्सीद्वारे बांधकाम कार्यात वाढ झाली आहे. भारत सरकारने गेल्या 2 वर्षात आमचे बजेट 100 टक्के वाढवले ​​आहे.

याचबरोबर बीआरओचे डीजी लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी पुढे म्हणाले की, गेल्या 3 वर्षांत 295 रस्ते, पूल, बोगदे आणि एअर डिस्पॅच युनिट्स बांधण्यात आले आहेत, ज्यांचे उद्घाटन आमचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. ते अशा ठिकाणीही गेले आहेत जिथे आजवर एकही संरक्षण मंत्री गेला नाही. 12 सप्टेंबर रोजी त्यांनी 90 प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. आमचे आणखी 60 प्रकल्प 4 महिन्यांत तयार होतील.

big step taken by the Modi government in the background of India China border dispute

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात