विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाबमध्ये आम आदमी पक्ष (आप) मोठ्या फरकाने निवडणूक जिंकणार असल्याचे संकेत सगळ्याच एक्झिट पोलने दिले आहेत. यामुळे कॉँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांचे धाबे दणाणले असून त्यांना स्वत:ची चिंता सतावू लागली आहे. याठिकाणाहून सर्वाधिक पाच खासदार निवडून जाणार असल्याने आशेवर बसलेल्या कॉग्रेस नेत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.Big Congress leaders are worried about how to get elected as Rajya Sabha term is coming to an end.
पुढील महिन्यात राज्यसभेची मुदत संपणाऱ्या सहा राज्यांमधील १३ जागांसाठी निवडणूक आयोगाने ३१ मार्च रोजी निवडणूक जाहीर केली आहे. पुढील महिन्यात राज्यसभेची मुदत संपणाऱ्या नेत्यांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटोनी व माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांचा समावेश आहे.
आसाम, हिमाचल प्रदेश, केरळ, त्रिपुरा, नागालँड व पंजाब या राज्यांमधून या १३ जागा भरल्या जाणार आहेत. यात पंजाबमधून तब्बल पाच राज्यसभेच्या जागा आहेत. पंजाबमध्ये येत्या काही दिवसांतच नवी विधानसभा अस्तित्वात येत आहे. यामुळे या विधानसभेतून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील,
यावर राज्यसभेत जाण्याची संधी मिळणार आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रताप सिंग बाजवा यांचाही समावेश आहे. पंजाब वगळता इतर राज्यांतील सदस्यांची मुदत २ एप्रिलला तर पंजाबमधून निवडून आलेल्या सदस्यांची मुदत ९ एप्रिलला संपणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App