डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीच्या चार उमेदवारांनी सोडलं निवडणुकीचं मैदान
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद ( Ghulam Nabi Azad ) यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीला (डीपीएपी) पुन्हा एकदा झटका बसला आहे. पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी दाखल केलेल्या आझाद यांच्या 10 उमेदवारांपैकी चार जणांनी आपली नावे मागे घेतली आहेत.
ज्या उमेदवारांनी आपली नावे मागे घेतली ते आझाद यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोडा, रामबन आणि किश्तवाड भागातील आहेत. या भागात आता फक्त अब्दुल मजीद वाणी दोडा विधानसभा मतदारसंघात आझाद यांचा झेंडा हातात धरताना दिसत आहेत. दुसऱ्या टप्प्यासाठी सध्या नामांकन फेरी सुरू आहे
दोन दिवसांपूर्वी आझाद यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातून माघार घेण्याची घोषणा केली होती. यासोबतच त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय उमेदवारांवर सोडला होता.
आझाद यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, 25 ऑगस्टच्या रात्री आझाद यांची प्रकृती श्रीनगरमध्ये खालावली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते उपचारासाठी नवी दिल्लीला गेले आणि तेथे दोन दिवस एम्समध्ये दाखल होते. सध्या ते विश्रांती घेत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App