विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: मनोरंजन विश्वातील सर्वात मोठी बातमी पुढे आली आहे. झी एण्टरटेन्मेंटने माहिती दिली आहे की, सोनी पिक्चर्स (सोनी इंडिया) मध्ये झी एंटरटेन्मेंटचे विलीनीकरण होणार आहे. सदर विलीनीकरणानंतर देखील पुढील पाच वर्ष पुनीत गोएंका हेच एम.डी. आणि सीईओ म्हणून काम करणार आहेत. झी मिडीया ही कंपनी या व्यवहारात सहभागी नाही. सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व झी एण्टरटेन्मेंट यांचे विलीनीकरण झाले आहे. या करारावर सह्या देखील झालेल्या आहेत. या व्यवहारानंतर सोनी कडे ५२.९३% हिस्सेदारी असेल तर झी लिमिटेडकडे ४७.७% हिस्सेदारी राहणार आहे.
Big announcement in entertainment world! Zee entertainment announces Merger with sony india
सोनी कंपनी झीमध्ये ११५०० कोटी या व्यवहारांतर्गत विलीनीकरण झाल्यावर गुंतवणार आहे. झीच्या संचालक मंडळाची पण याला परवानगी मिळालेली आहे. केवळ आर्थिक गोष्टींचे मूल्यांकन करण्यात आलेले नसून भविष्यातील रणनीतिक काय असेल आणि कोणत्या व्हॅल्यूवर लक्ष्य केंद्रित करण्यात येईल हे देखील ठरवण्यात आले आहे, असे झी मीडियाच्या प्रवक्त्यानी सांगितले आहे.
Ind vs Eng : मैदानावर जमके करेंगे राडा ! आता भर मैदानात भिडले बुमराह आणि बटलर ; पाहा व्हिडीओ
सोनी पिक्चर्सचे एम.डी. आणि सी.इ.ओ. सिंग यांच्या भविष्यातील पदाबद्दल अजून कोणतीही माहिती पिढी आलेली नाहीये. ह्या एकत्रीकरना नंतर दोन्ही वाहिन्यांकडे मिळून एकूण ७५ टीव्ही चॅनेल्स असतील तर २ ओटीटी(झी5 & सोनी लिव्ह) प्लॅटफॉर्म असतील. झी स्टुडिओ आणि सोनी पिक्चर्स फिल्म्स ह्यांच्या तसेच २ डिजिटल स्टुडिओच्या एकत्रीकरणामुळे आता मनोरंजन विश्वातील सर्वात मोठे नेटवर्क तयार झाले आहे. हे नेटवर्क स्टार आणि डिस्नी पेक्षाही मोठे असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App