विशेष प्रतिनिधी
मॉस्को – विविध मुद्द्यांवरून अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंध ताणले गेले असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी पुढील महिन्यात जीनिव्हा येथे थेट भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. १६ जूनला ही बैठक होणार असून अध्यक्षपदावर आल्यानंतरचा बायडेन यांचा हा पहिलाच विदेश दौरा असेल. Biden – Putin will meet on 16 june
या बैठकीसाठी कोणतीही पूर्वअट ठरविण्यात आलेली नाही, असेही ‘व्हाइट हाऊस’च्या माध्यम प्रतिनिधी जेन साकी यांनी स्पष्ट केले. पुतीन आणि बायडेन यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष लागणार असले तरी यातून फार काही निष्पन्न होण्याची स्वत: बायडेन यांना अपेक्षा नाही. रशियाबरोबर चांगले संबंध ठेवण्यासाठी बराक ओबामा आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी विशेष प्रयत्न केले होते. सध्याच्या परिस्थितीत संबंध पूर्ववत होणे शक्य नसल्याचे बायडेन यांचे मत आहे. रशियाने मात्र या बैठकीबाबत प्रतिक्रिया देताना, अमेरिकेबरोबरील संभाव्य संबंधांबाबत आणि इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App