वृत्तसंस्था
नवी दिल्ली : बी. आर. चोप्रा यांच्या सुप्रसिद्ध महाभारत मालिकेतील “भीम” प्रवीण कुमार यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले आहे. आशियाई सुवर्ण पदक विजेते खेळाडू म्हणूनही त्यांची देशाला ओळख होती. “Bhim” in the Mahabharata Praveen Kumar behind the curtain of time; Mohor had won the Asian Gold Medal twice !!
आपल्या 6.5 फूट उंची मुळे आणि मजबूत बांधा मुळे त्यांची बी. आर. चोप्रा यांनी महाभारत असल्या :भीम” या पात्रासाठी निवड केली होती. आपल्या अभिनयाच्या ताकदीवर त्यांनी ती उत्तम साकारली होती. ते जरी थाळीफेक आणि हॅमर फेक विभागातले आशियाई सुवर्ण पदक विजेते खेळाडू होते, तरी त्यांची देशभरातली ओळख ही महाभारतात भीम भूमिका साकारणारे अभिनेते म्हणून अधिक गाजली.
प्रवीण कुमार सीमा सुरक्षा दलात लेफ्टनंट म्हणून कार्यरत होते. त्यांनी म्युनिक सह दोन ऑलिम्पिक मध्ये देखील भारताचे प्रतिनिधित्व केले होते. दोन वेळा आशियाई सुवर्णपदक आणि तीन वेळा कॉमनवेल्थ सुवर्णपदक ही त्यांची खेळांमधली कामगिरी होती.
प्रवीण कुमार यांना केंद्र सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन गौरविले होते. मात्र पंजाब मधल्या कोणत्याही सरकारांनी आपल्या खेळातील कामगिरीची दखल घेतली नव्हती. आपल्याला पेन्शन दिली नव्हती, अशी खंत प्रवीण कुमार यांनी नुकतीच एका मुलाखतीत व्यक्त केली होती. सीमा सुरक्षा दलाकडून त्यांना निवृत्ती वेतन मिळत होते. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगी विवाहित मुलगी असा परिवार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App