वृत्तसंस्था
नवी दिल्ली – केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी आंदोलनाला आज ५०० दिवस पूर्ण होताना काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्विट केले. पण त्याकडे दुर्लक्ष करून शेतकरी आंदोलनाचे नेते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या वळचणीला गेल्याचे दिसले. Bharatiya Kisan Union leader Rakesh Tikait meets West Bengal CM Mamata Banerjee on issues related to agriculture and local farmers
शेतकरी आंदोलनाचे एक नेते आणि भारतीय किसान युनियनचे प्रमुख राकेश टिकैत यांनी ममता बॅनर्जी यांची कोलकात्यात मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन भेट घेतली. या वेळी ममतांसमवेत माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि बंगाल निवडणूकीपूर्वी तृणमूळ काँग्रेसमध्ये सामील झालेले नेते यशवंत सिन्हा उपस्थित होते. केंद्रातील मोदी सरकारने आणलेले कायदे म्हणून ममता बॅनर्जींनी त्यांना विरोध केला होताच. आज त्याचा त्यांनी शेतकरी आंदोलनाच्या नेत्यांसमोर पुनरूच्चार केला.
शेतकरी आंदोलक नेत्यांनी ममतांचे पाठिंब्याबद्दल आभार मानले. बंगाल हे शेतकऱ्यांसाठी मॉडेल स्टेट बनविण्याचे आश्वासन ममतांनी दिल्याचे राकेश टिकैत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
-नवा नेता मिळाला
कोरोना काळ आणि भरपूर दिवस झाल्याने शेतकरी आंदोलन भरकटले आणि थंडावले होते. पण ममतांच्या रूपाने आंदोलनाला नवा नेता मिळाला आहे. जो सत्तेवर आहे आणि पंतप्रधान मोदींचा खमका विरोधक आहे. राकेश टिकैत आणि त्यांच्या सहकार्यांनी बंगलामध्ये जाऊन ममतांचा प्रचार देखील केला होता. त्यामुळे ममतांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलनाला नवी झळाळी देण्याचा शेतकरी नेत्यांचा प्रयत्न आहे.
The Chief Minister assured us that she will continue to support the farmers' movement. We thank her for this assurance. West Bengal should work as a model state and farmers should be given more benefits: Bharatiya Kisan Union leader Rakesh Tikait pic.twitter.com/DFbk9YbHAM — ANI (@ANI) June 9, 2021
The Chief Minister assured us that she will continue to support the farmers' movement. We thank her for this assurance. West Bengal should work as a model state and farmers should be given more benefits: Bharatiya Kisan Union leader Rakesh Tikait pic.twitter.com/DFbk9YbHAM
— ANI (@ANI) June 9, 2021
तसेही ममता बॅनर्जी या बंगालमध्ये विजय मिळविल्यानंतर उत्साहात आहेत. त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा बंगालबाहेर देखील उफाळून आल्याचे बोलले जात आहे. उत्तर प्रदेशात तृणमूळ काँग्रेस निवडणूक लढविण्याच्या बेतात आहे. त्यासाठी पक्षाचे नाव अखिल भारतीय करण्यापासून विविध नेत्यांना गळाला लावण्यापर्यंतचे प्रयोग करण्यात येणार आहेत.
मायावतींचे एकेकाळचे रणनीतीकार सतीशचंद्र मिश्रा हे ममतांना येऊन मिळण्याच्या बेतात असल्याचीही चर्चा आहे. त्यातच ज्यांचे नाव उत्तर प्रदेशात बऱ्यापैकी चर्चेत असते, ते राकेश टिकैत यांनीही ममतांची भेट घेतली आहे. त्यामुळे ममतांची महत्त्वाकांक्षा आणि केंद्रीय पातळीवर नवीन मोदी विरोधी नेत्याचा शोध हे समीकरण जूळविण्याचे प्रयत्नांना जोर आला आहे. राकेश टिकैत यांनी ममतांची भेट घेण्याला हा एक महत्त्वाचा संदर्भ आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App