राहुल गांधी : जावे कंटेनरच्या गावा; तेथूनी भारत जोडावा!!

विनायक ढेरे

नाशिक : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत तब्बल 3570 किलोमीटरच्या भव्य भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत. त्यांच्यासाठीचा तामझाम साधासुधा नाही. राहुल गांधी या प्रचंड भारत जोडो यात्रेत कुठल्याही गावातल्या त्रितारांकित, चौथारांकित अथवा पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणार नाहीत, तर ते राहणार आहेत एसी बसवलेल्या कंटेनर मध्ये!! राहुलजींच्या भारत जोडो यात्रेच्या बातमीतील ही हायलाईट आहे!! bharat jodo yatra rahul gandhi to sleep in container

तब्बल 150 दिवस चालणाऱ्या या यात्रेत राहुलजी कोणत्याही गावाला तालुक्याला अथवा शहराला डिस्टर्ब न करता कंटेनर मध्येच राहणार जेवणार आणि झोपणार आहेत. परंतु ही कंटेनरची व्यवस्था फक्त राहुल गांधी यांच्यासाठी नसून त्यांच्याबरोबर संपूर्ण यात्रेत साडेतीन हजार किलोमीटर सतत प्रवास करणाऱ्या शेकडो व्हीआयपी यात्रेकरूंसाठी देखील आहे. भारत जोडो यात्रेत जसा राहुल गांधींचा खास एसी कंटेनर असणार आहे, तसेच 60 कंटेनर तयार करून ते या यात्रेबरोबर दिले जाणार आहेत. राहुल गांधींचा यात्रेदरम्यान जिथे मुक्काम असेल तिथे 60 कंटेनरच्या माध्यमातून एक छोटे गावच वसवले जाणार आहे. मुक्काम उठला की तंबू उठवल्यासारखे हे कंटेनर उचलून दुसऱ्या मुक्कामी नेले जाणार आहेत. या कंटेनर मध्ये राहुल गांधी यांच्यासाठी तसेच यात्रेकरूंसाठी विशिष्ट सोयी सुविधा देखील करून घेतल्या आहेत. त्यामध्ये छोटी लिविंग रूम, बेडरूम आणि अटॅच टॉयलेट बाथरूम अशी सोय असणार आहे. यातला प्रत्येक कंटेनर सेंट्रलाईज्ड एसी असणार आहे.



देशभरात साडेतीन हजार किलोमीटर पेक्षा अधिक अंतर ही यात्रा कापणार असणारे सर्वच गाव शहरांमध्ये हवामान सारखे नसेल हे गृहीत धरून कंटेनर मधील तापमान, आर्द्रता वगैरेची योग्य सोय केली आहे. राहुल गांधी हे अर्थातच कोणत्याही गावात अथवा शहरात मोठ्या हॉटेलमध्ये राहणार नसल्याने काँग्रेस पक्षाचा मोठा खर्च जरूर वाचला आहे. परंतु, एवढ्या मोठ्या भारत जोडो यात्रेत प्रत्येक ठिकाणी 60 कंटेनरचे गाव बसवण्याचा खर्च मात्र काँग्रेस पक्ष करणार आहे.

 चंद्रशेखर यांची एसी झोपडी

राहुल गांधींच्या जोडो यात्रेच्या निमित्ताने माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या देखील याच नावाच्या यात्रेची आठवण झाल्या खेरीज राहात नाही. 1990 च्या दशकात त्यांच्यासाठी महाराष्ट्रातल्या परंदवडी येथे एक खास झोपडी उभारण्यात आली होती. ही झोपडीही एसी होती. त्यावेळी या मुद्द्यावरून चंद्रशेखर यांच्यावर त्या वेळच्या प्रिंट मीडियातून जोरदार टीकेची जोड उठवली गेली होती.

आता मात्र राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेदरम्यान पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणार नाहीत याच्या मोठ्या प्रमाणावर बातम्या सर्वच माध्यमांनी दिल्या आहेत. परंतु ते कंटेनर मध्ये राहणार जेवणार आणि झोपणार आहेत. इतकेच काय पण राहुलजींबरोबर असणाऱ्या भारत जोडो यात्रेकरूंसाठी 60 कंटेनर कायम बरोबर राहणार आहेत या बातमीकडे मात्र माध्यमांचे तितकेसे लक्ष गेलेले दिसत नाही. अर्थातच राहुलजींच्या आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या यात्रेकरूंचा पंचतारांकित निवासाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचला आहे. हे खरेच पण 150 दिवसांचा 60 कंटेनर चा खर्च मात्र काँग्रेस पक्ष करणार आहे ही बाब येथे अधोरेखित केली पाहिजे.

bharat jodo yatra rahul gandhi to sleep in container

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात