लव्ह जिहाद प्रकरणावरून नवनीत राणा आक्रमक; “मुलीचा शोध घ्या”, अमरावती पोलिसांना इशारा

प्रतिनिधी

अमरावती : अमरावती शहरात आणखी लव्ह जिहाद प्रकरणानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. अमरावतीत एका हिंदू 19 वर्षीय युवतीचे काल, मंगळवारी अपहरण केले, मुलीने केलेल्या चॅटिंग वरून पोलिसांनी सोहेल शहा या संशयित आरोपीला राजापेठ पोलीस ठाण्यात आणले. मात्र अद्याप मुलगी बेपत्ता असल्याने भाजप, विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या आहेत. यावेळी नवनीत राणा हे पोलीस ठाण्यात आक्रमक होत संबधित मुलीला समोर आणा, अशी त्यांनी मागणी केली आहे. २ तासांत मुलीचा शोध लावा, असा अल्टिमेटम राणा यांनी पोलिसांना यावेळी दिले आहे. Navneet Rana is aggressive on the Love Jihad case

नवनीत राणा काही कार्यकर्त्यांसह राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल होत त्यांनी मुलीला समोर आणण्याची मागणी केली. लग्नानंतर आरोपीने मुलीला डांबून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. नवनीत राणा यांनी असे सांगितले की, पतीने मुलीला डांबून ठेवले असल्याची तक्रार घेऊन मुलीचे पालक माझ्याकडे आले होते. त्यानंतर नवनीत राणा यांनी पोलिसांना कॉल केला असता त्यांनी माझा कॉल रेकॉर्ड का केला??, यावरून नवनीत राणा व पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला. कॉल रेकॉर्ड करण्याचे अधिकार तुम्हाला दिले कोणी??, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पुढे राणा असेही म्हणाल्या की, अमरावतीची बदनामी का होत आहे. 19 वर्षांची हिंदू मुलगी आहे. त्या मुलाला पकडून आणले आहे. रात्रीपासून चौकशी करत आहेत, मात्र काही समोर येत नाही. मुलगी कुठे आहे. याबाबत उत्तर दिले जात नाही. त्या मुलाच्या परिवाराला इथे पकडून आणा, एका तासात सगळं बाहेर येईल. यासह मुलाचा एक समूह आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Navneet Rana is aggressive on the Love Jihad case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात