वृत्तसंस्था
कोलकाता : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आपले नाव कोलकत्याच्या मतदार यादीत नोंदवून घेतले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या महत्वाच्या भवानीपूर पोट निवडणुकीपूर्वी त्यांनी हे काम करून घेतले आहे. ते प्रशांत किशोर असे जरी नाव नुसते लावत असले तरी त्यांचे आडनाव पांडे आहे, असे त्यांच्या नोंदणी करून दिसून येते. Before Mamatas by-election, Prashant Kishor registered his name in the Kolkata voter list
प्रशांत किशोर पांडे हे मूळचे बिहारमधल्या सासाराम जिल्ह्याचे रहिवासी आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची रणनीती ठरविण्याचे काम त्यांनी केले होते. त्यात त्यांना अभूतपूर्व यश आले. परंतु खुद्द ममता बॅनर्जी मात्र नंदिग्राम मधील निवडणूक हरल्या. त्यामुळे भवानीपूरच्या पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागत आहे.
अशा स्थितीत भाजपने आपल्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल करू नये तसेच ममता बॅनर्जी यांना मदत व्हावी या हेतूने प्रशांत किशोर पांडे यांनी आपले नाव पश्चिम बंगालमधल्या मतदार यादीत नोंदवून घेतले आहे. यासाठी त्यांनी आपला “केअर ऑफ” पत्ता खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानाचा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App