विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 10 जागा आल्या असताना तेवढे 10 उमेदवार देखील जाहीर करण्यात पवारांच्या पक्षाची दमछाक झाली आहे. सुरुवातीला पवार फक्त 5 उमेदवार जाहीर करू शकले. त्यानंतर उरलेले 5 उमेदवार देखील त्यांना एका यादीत जाहीर करता आलेले नाहीत. beed loksabha candidate bajrang sonwane
पवारांच्या पक्षाने आज बीड आणि भिवंडी या दोनच लोकसभा मतदारसंघांची यादी जाहीर केली. त्यातही त्यांनी बीडमध्ये आपला जुनाच डाव खेळला. बजरंग सोनवणे यांना अजित पवारांकडून खेचून घेऊन त्यांच्याच गळ्यात बीडची उमेदवारी घातली. त्यामुळे पवारांना भेटून गेलेल्या ज्योती मेटे यांचा पत्ता परस्पर कट झाला. भिवंडी त्यांनी बाळ्या मामा म्हात्रे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. बजरंग सोनवणे यांची आता पंकजा मुंडे यांच्या विरोधात लढत होणार आहे. एकीकडे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे एकत्रित बळ, तर दुसरीकडे फुटलेल्या राष्ट्रवादीची उमेदवारी अशी ही लढत असणार आहे.
बजरंग सोनवणे यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची पहिलीच वेळ नाही. 2019 मध्ये त्यांनी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात बीडमधूनच निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असून देखील मोदी लाटेत बजरंग सोनवणे यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यानंतर सुरुवातीला बजरंग सोनवणे अजित पवारांच्या गटात गेले, पण तिथून बीडची उमेदवारी मिळणार नाही कारण तो मतदारसंघ अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुटणारच नाही हे लक्षात येताच बजरंग सोनवणे यांनी शरद पवारांच्या पक्षात उडी मारली.
NCP (Sharad Pawar) announced the name of its candidate from Bhiwandi seat; Suresh Mhatre will be the candidate from Bhiwandi. Bajrang Sonawane will be the candidate from the Beed seat. pic.twitter.com/vH5ALrVH1m — ANI (@ANI) April 4, 2024
NCP (Sharad Pawar) announced the name of its candidate from Bhiwandi seat; Suresh Mhatre will be the candidate from Bhiwandi. Bajrang Sonawane will be the candidate from the Beed seat. pic.twitter.com/vH5ALrVH1m
— ANI (@ANI) April 4, 2024
पण त्यांच्या उमेदवारीत ज्योती मेटे यांच्या भेटीगाठीतून अडथळा निर्माण झाला. ज्योती मेटे कालच शरद पवारांना भेटल्या होत्या. त्यांनी बीडमधून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. पवारांनी त्यांना “बघू” एवढेच उत्तर दिले होते. त्यामुळे ज्योती मेटे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापासून पाऊल मागे घेतले होते. पवारांनी आज बजरंग सोनवणे यांच्यावरच “जुना डाव” खेळत बीडमधून त्यांची उमेदवारी जाहीर केल्याने ज्योती मेटे यांचा पत्ता परस्पर कट झाला. आता त्या वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक लढवतात का??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App