वृत्तसंस्था
नवी दिल्ली : माध्यम स्वातंत्र्याचा डंका पिटत संपूर्ण जगाला लोकशाही – स्वातंत्र्य ही मूल्ये शिकवत फिरणाऱ्या ब्रिटिश ब्रोडकास्टिंग कॉर्पोरेशन BBC या संस्थेने अखेर भारतात इन्कम टॅक्स चुकवल्याची कबुली दिली आहे. अर्थात केंद्रातील मोदी सरकारने कायदेशीर कसोटीवर पुरत्या नाड्या आवळल्यानंतर बीबीसीने BBC ही कबुली दिली आहे. BBC ‘accepts’ it paid lower taxes in India
भारतात इन्कम टॅक्स चुकविल्याबद्दल इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काही महिन्यांपूर्वीच राजधानी नवी दिल्ली आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई या दोन शहरांमध्ये बीबीसीच्या कार्यालयांवर छापे घातले होते. तिथली काही कागदपत्रे जप्त केली होती त्यानंतर कोर्टात कायदेशीर प्रक्रियाही सुरू झाली. तेव्हा बीबीसी BBC आणि भारतातील तिच्या समर्थकांनी पुन्हा एकदा भारतात लोकशाही नसल्याचा ढोल वाजवला होता. पण तरीही कायदेशीर कारवाई थांबली नाही आणि अखेरीस जेव्हा कायद्याच्या कसोटीवर बीबीसीच्या पुरत्या नाड्या आवळल्या गेल्या तेव्हा बीबीसीने इन्कम टॅक्स कमी भरला गेल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे बीबीसी आता 40 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडे जमा करणार आहे.
अर्थात BBC ने यासंदर्भातली लेखी कबुली इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडे दिलेली नाही, तर फक्त 40 कोटी रुपये भरण्याचा भरण्याची परवानगी मागणारा अर्ज केला आहे. अर्थात बीबीसी ने नेमका किती कर चुकवला याचे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे असेसमेंट बाकी आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने बीबीसीने 40 कोटी रुपये इन्कम टॅक्स चुकवल्यानंतर संस्थेविरुद्धची केस मागे घेण्याची कोणतीही कमिटमेंट दिलेली नाही.
मात्र हीच ती BBC ब्रिटिश सरकारी माध्यम संस्था आहे, जी जगभरात अनेक देशांमध्ये लोकशाही आणि स्वातंत्र्य या विषयांवर लेक्चरबाजी करत असते. पण प्रत्यक्षात संस्थात्मक पातळीवर आर्थिक शिस्त पाळत नाही आणि कायद्याचा बडगा समोर दिसताच कशी “सरळ” होते त्याचे हे उदाहरण आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App