वृत्तसंस्था
नवी दिल्ली: देशातील अनेक राज्यांमधील खाजगी आणि सार्वजनिक बँका या आठवड्यात तब्बल पाच दिवस बंद राहणार आहेत.कारण छठ पूजा आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील बँका बंद राहणार आहेत. Banks holiday for Chhath Puja: Private and public banks will be closed for five days this week
छठ पूजेमुळे बिहार, झारखंडमध्ये बँका बंद राहणार आहेत. पाटणा आणि रांचीमध्ये १० नोव्हेंबरला बँका बंद राहतील. त्याचवेळी, ११ नोव्हेंबर रोजी छठ पूजेमुळे पाटण्यात बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दिल्ली सरकारने छठ पूजेच्या निमित्ताने १० नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी दिली आहे.
बिहार, झारखंडमध्ये छठ पूजा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्यामुळे पाटणा आणि रांचीमधील सर्व बँका १० नोव्हेंबरला बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या सुट्टीच्या यादीनुसार, नोव्हेंबरमध्ये १३ कामकाजाचे दिवस आणि १७ सुट्ट्या असतील. तथापि, सुट्टीची यादी राज्यानुसार बदलू शकते.
उदाहरणार्थ बिहारमधील बँक शाखा छठ पूजेसाठी बंद राहतील. परंतु ईशान्येकडील राज्यांत त्या बंद राहणार नाहीत. नोव्हेंबरमधील १७ बँक सुट्ट्यांपैकी ११ सुट्या उत्सवाच्या आहेत आणि उर्वरित ७ दिवस शनिवार व रविवारच्या सुट्या आहेत (महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारसह सर्व रविवार).
१० नोव्हेंबर : सूर्य पष्टी दाला छठ (सूर्य अर्ध्य)/ छठ पूजा ११नोव्हेंबर : छठ पूजा ( पाटणा) १२ नोव्हेंबर : वांगला महोत्सव (फक्त मेघालय राज्यात) १३ नोव्हेंबर : महिन्याचा दुसरा शनिवार १४ नोव्हेंबर : रविवार १९ नोव्हेंबर: गुरु नानक जयंती/कार्तिका पौर्णिमा २२ नोव्हेंबर : कनकदास जयंती २३ नोव्हेंबर: सेंग कुत्स्नेम
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App