बॅँक भरती परीक्षा आता मराठीसह १३ प्रादेशिक भाषांमध्येही, जाहिरातीही प्रादेशिक भाषांतून देण्याच्या अर्थमंत्रालयाच्या सूचना


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बॅँकेतील लिपिक पदासाठी भरतीच्या परीक्षा आता मराठीसह १३ प्रादेशिक भाषांमधून देता येणार आहेत. त्याचबरोबर आता बॅँकींग भरतीच्या परीक्षांची जाहिरातही प्रादेशिक भाषांतून देण्याच्या सूचना केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिल्या आहेत. इंग्रजी आणि हिंदी व्यतिरिक्त, उमेदवार त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देऊ शकतील.Bank Recruitment Examination Now in 13 Regional Languages ​​including Marathi, Advertisements in Regional Languages

आता पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षा संबंधित प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येतील. प्रादेशिक भाषांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये लिपिक संवर्गांसाठी परीक्षा आयोजित करण्याबाबत समितीची स्थापना करण्यात आली होती. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, समितीच्या शिफारशी उपलब्ध होईपर्यंत सुरू केलेली परीक्षेची प्रक्रिया रोखून ठेवण्यात आली होती.



स्थानिक तरुणांना समान संधी देण्याच्या उद्देशाने समितीने काम केले आहे. देशातील तरुणांना रोजगार देण्याचे या समितीचे उद्दिष्ट आहे.अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, प्रादेशिक भाषांमध्ये संभाषण केल्यामुळे ग्राहकांना उत्तम सेवा देणे शक्य होईल. त्यांच्याशी संवादही साधता येईल.

आधीच जाहिरात केलेल्या रिक्त पदांसाठी आणि ज्यासाठी प्राथमिक परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्या एसबीआयची सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया जाहिरातीनुसार पूर्ण केली जाईल. प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भविष्यातील रिक्त पदांवर देखील लागू होईल.

Bank Recruitment Examination Now in 13 Regional Languages ​​including Marathi, Advertisements in Regional Languages

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!