२०२१ मध्ये रमेश कुमार यांचा तक्रार अर्ज दाखल करून घेण्यात आला होता.
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : येथील ६८ वर्षीय रमेश कुमार पी.व्ही या ज्येष्ठ व्यक्तीला बँकेने ३५ पैशांसाठी त्रास दिला शिवाय अधिकची रक्कमही भरण्याचा तगादा लावल्याने, ग्राहक मंचाने एका खासगी कंपनली पाच हजार रुपयांचा दंड ठोठावत संबंधित ज्येष्ठ व्यक्तीला नोड्यूज सर्टिफिकेट देण्यास सांगितले आहे. Bank harassed 68 year old man for two years for 35 paise
रमेश कुमार यांनी २०१९ मध्ये एका खासगी कंपनीचे क्रेडीट कार्ड बंद करण्याचा निर्णय घेतला होता, जे ते अनेक वर्षांपासून वापरत होते. यानंतर त्यांना संबंधित बँकेकडून थकीत ३५ पैसे जमा करण्यासाठी फोन येऊ लागले, असे जवळपास दोन वर्षे सुरू होते. अखेर रमेश कुमार यांनी २०२१ मध्ये बँकेच थकीत ३५ पैसे आणि वार्षिक शुल्क असे एकूण ५९५ रुपये भरणा केले.
मात्र प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, बँकेकडून रमेश यांना तुमच्याकडे आणखी सहा हजार रुपये बाकी असल्याचे सांगितले गेले आणि ते देखील तुम्हाला भरावे लागतील असे म्हटले गेले. त्यामुळे संतप्त झालेल्या रमेश कुमार यांनी थेट ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.
एप्रिल २०२२ मध्ये रमेश यांचा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला, ज्यामध्ये त्यांनी ३५ पैसै बाकी असल्याच्या नावाखाली आतापर्यंत त्यांना संबंधित बँकेकडून कशाप्रकारे त्रास दिला गेला हे सांगितले. शिवाय अधिकची रक्कमही मागितली गेल्याचे ते म्हणाले. कोर्टाने दोन्ही बाजूंची पडताळणी केल्यानंतर पीडित रमेश कुमार यांच्या बाजूने निकाल दिला. एवढच नाहीतर संबंधित बँकेस रमेश कुमार यांना ५००० हजार रुपये नुकसानभरपाई आणि तत्काळ नो ड्यूज सर्टिफिकीट देण्याचेही आदेश दिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App