नाशिक : खुद्द पाकिस्तानात महागाई आणि वस्तूंचा खडखडाट, पण बांगलादेशाला आता पाकिस्तान कडून आयात वाढवण्याची खाज!! अशी परिस्थिती नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस यांच्या राजवटीत बांगलादेशावर ओढवली आहे.
बांगलादेशाने आपल्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच पाकिस्तान बरोबर व्यापार करण्याची तयारी दाखवून 25 दशलक्ष टन बासमती तांदूळ आयात केला. तो चीन आणि भारत यांच्यापेक्षा स्वस्तात पडला, असा दावा बांगलादेशातल्या मंत्र्यांनी केला. त्यामुळेच आपल्याला पाकिस्तान मधून स्वस्त माल मिळू शकेल, अशी आशा बांगलादेशी राजवटीला वाटायला लागली आणि त्यातूनच पाकिस्तानशी व्यापार वाढवायचे टूम मोहम्मद युनूस यांच्या सरकारने काढली.
पण खुद्द पाकिस्तानातच जिथे महागाई प्रचंड वाढली असताना आणि वस्तूंच्या खडखडाट असताना तो देश बांगलादेशाला कसा काय स्वस्तात माल पुरवू शकेल??, सर्वसामान्य बुद्धीला पडणारा प्रश्न देखील नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थशास्त्रज्ञाच्या बांगलादेशाला पडला नाही.
पण त्या पलीकडे जाऊन बांगलादेशातल्या माध्यमांनी बांगलादेशाच्या व्यापाऱ्याविषयी सादर केलेली आकडेवारी जास्त धक्कादायक आहे. कारण बांगलादेश चीनकडून तब्बल 16.63 अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तूंची आयात करतो. त्याचे प्रमाण बांगलादेशाच्या एकूण आयातीच्या 24% आहे, तर भारताकडून 9 अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तूंची आयात करतो. त्याचे प्रमाण एकूण आयातीच्या 14.3 % आहे, तर पाकिस्तान कडून बांगलादेश फक्त 627.8 मिलियन डॉलर्स किमतीच्या वस्तूंचे आयात करू शकतो ज्याचे प्रमाण फक्त 1 % आहे. यामध्ये कापूस, यार्न आणि फॅब्रिक तसेच काही अन्य वस्तूंचा समावेश आहे. त्या पलीकडे बांगलादेशाला निर्यात करण्याजोग्या पाकिस्तानकडे वस्तूच नाहीत. पण बांगलादेशाला आता पाकिस्तान कडून फळे आणि भाजीपाला हवा आहे. ज्यांच्या किमती आधीच पाकिस्तानमध्ये गगनाला भिडलेल्या आहेत. त्या बांगलादेशाला मात्र पाकिस्तान कडून स्वस्तात पाहिजे आहेत. नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस यांच्या राजवटीतला हा उरफाटा कारभार सुरू आहे.
मूळात भारताच्या मदतीने स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर त्या देशाने पाकिस्तानशी कुठले व्यापारी संबंध ठेवले नव्हते. शिवाय पाकिस्तानची देखील तशी परिस्थिती आणि इच्छा नव्हती. पण आता मोहम्मद युनूस यांच्या राजवटीत फक्त भारताचा द्वेष वाढविण्यासाठी पाकिस्तान कडून जास्तीत जास्त वस्तू आयात करण्याचा घाट युनूस सरकारने घातला आहे. पण उघड्यापाशी नागड्याने जाण्याचा हा प्रकार आहे. कारण पाकिस्तानची उत्पादन आणि व्यापारातली खस्ता हालत लक्षात घेता पाकिस्तान निर्यात तरी काय करणार, आणि ती बांगलादेश काय घेणार??, अशीच सगळी “दिव्य” परिस्थिती आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App