Shakib Hasans : बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब हसनची कारकीर्द धोक्यात

Shakib Hasans

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे घेणार मोठा निर्णय!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन ( Shakib Hasans ) पाकिस्तानविरुद्ध कसोटी खेळत असला तरी या दिग्गज खेळाडूच्या अडचणी वाढू शकतात. तसेच शाकिब अल हसनची कारकीर्द धोक्यात येऊ शकते. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष फारुख अहमद यांनी शाकिब अल हसन विरुद्धच्या हत्येप्रकरणी गुन्ह्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष फारुख अहमद यांनी शनिवारी सांगितले की, पाकिस्तानविरुद्धच्या रावळपिंडी कसोटीनंतर शकिब अल हसनच्या भवितव्याबाबत निर्णय घेतला जाईल.



याआधी गुरुवारी कापड कारखान्यातील कर्मचारी रुबेलचे वडील रफिकुल इस्लाम यांनी शकीब अल हसनविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. शनिवारी शेर-ए-बांगला नॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या दीर्घ बैठकीनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष फारूख अहमद म्हणाले की, त्यांना अद्याप कायदेशीर नोटीस मिळालेली नाही. मात्र, ३० ऑगस्टला रावळपिंडी येथे होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी शाकिब अल हसनबाबत निर्णय घेणार असल्याचे त्याने सांगितले.

पत्रकार परिषदेत फारुख अहमद म्हणाले की, मी तुम्हाला साकिबबद्दल सांगतो, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्हाला अद्याप कोणतीही कायदेशीर सूचना प्राप्त झालेली नाही. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणाची चौकशी केली जाईल.

Bangladesh all rounder Shakib Hasans career is in danger

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात