विशेष प्रतिनिधी
बेंगळुरू: बुल्लीबाई अॅपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांची बदनामी केल्याप्रकरणी मुंबई पोलीसांनी बंगळुरु येथील एका २१ वर्षीय अभियंत्याला ताब्यात घेतले आहे. सिव्हील इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षांत हा तरुण शिकत आहे.Bangalore engineer in custody in Bullibai app case, accused of defaming Muslim women
शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या पथकाने बेंगळुरू येथे छापा टाकत एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. मुंबईत नेऊन त्याची चौकशी केली जाणार आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
बुल्लीबाई अॅपवर मुस्लिम महिलांचे आक्षेपार्ह फोटो टाकून त्यांच्यावर बोली लावली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रविवारी मुंबई सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करत तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला होता. त्यानंतर बेंगळुरूत छापा टाकून एका २१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.
हा तरुण सिव्हिल इंजिनीअरिंग करत असून सेकंड ईयरला आहे. बुल्लीबाई अॅपवरील पाच फॉलोअर्सपैकी एक असलेल्या या तरुणाची मुंबईत नेऊन अधिक चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर त्याला अटक केली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली.
सोशल मीडियात सक्रिय असलेल्या किमान १०० मुस्लिम महिलांना बुल्लीबाई अॅपच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात आले आहे. त्यात एका महिला पत्रकारालाचाही समावेश असून या पत्रकाराने दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे याबाबत आॅनलाइन तक्रार केली आहे.
गिटहब प्लॅटफॉर्मवर हे अॅप लॉन्च करण्यात आले होते. अॅप डेव्हलप करणाऱ्या युजरला ब्लॉक करण्यात आले असल्याचे गिटहबकडून केंद्र सरकारला कळवण्यात आले आहे. अशाचप्रकारचे सुल्लीडील्स हे अॅप काही महिन्यांपूर्वी लॉन्च करण्यात आले होते. तेही नंतर ब्लॉक करण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App