दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसह, जखमींना शासनातर्फे तातडीची आर्थिक मदत जाहीर
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ओडिशातील रेल्वे अपघाताच्या दुर्घटनेनंतर गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा मडगाव स्थानकावर झेंडा दाखविण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार होते, तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या समारंभासाठी मडगाव स्थानकावर उपस्थित राहणार होते. अधिका-यांनी सांगितले की, रेल्वे मंत्री आता ओडिशातील अपघात स्थळाला भेट देतील आणि समारंभ रद्द करण्यात आला आहे. Balasore Train Accident Inauguration ceremony of Goa Mumbai Vande Bharat Express canceled
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी साडेदहा वाजता गोवा मुंबई वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार होते. मात्र, आता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मोदींनी ओडिशातील रेल्वे दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून ५०-५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान मोदींनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.
पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, “ओडिशात झालेल्या रेल्वे अपघातामुळे दु:ख झाले आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझ्या भावना शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी सदिच्छा आहे. याशिवाय ते म्हणाले, “रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. अपघातस्थळी बचावकार्य सुरू असून बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे.’’
पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, “ओडिशातील रेल्वे अपघातात प्राण गमावलेल्या प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना PMNRF कडून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना ५०-५० हजार रुपये दिले जातील. तर, रेल्वेमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना १०-१० लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी २ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना ५०-५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App