बडे दिलवाला, २० कोटी रुपयांची लॉटरी लागल्यावर पाच मित्रांमध्ये घेणार वाटून

विशेष प्रतिनिधी

मस्कत : ओमान येथे राहणाऱ्या एका भारतीयाला २० कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. मात्र, त्याने मोठे मन दाखवित लॉटरी तिकिट खरेदी करण्यासाठी पैसे देणाऱ्या पाच मित्रांमध्ये ही बक्षीसाची रक्कम वाटून घेण्याचे ठरविले आहे.Bade Dilwala, after winning the lottery of Rs Rs 20 crore divide into five friends

ओमानमध्ये राहणाऱ्या भारतीय प्रवाशाला शुक्रवारी रात्री ड्रॉमध्ये तब्बल एक कोटी दीरहाम (अमिरात चलन) म्हणजेच जवळपास २० कोटींची लॉटरी लागली आहे. या भारतीयाचं नाव रंजीत वेणुगोपालन उन्नीथन असं आहे. ४२ वर्षीय रंजीत मूळ केरळच्या कोल्लम जिल्ह्याचा रहिवासी आहे. हा ड्रॉ जिंकल्यानंतर रंजीत यंदाच्या वषार्तील शेवटचा ‘बिग तिकीट अबूधाबी’ करोडपती बनला आहे.



रंजीत यांनी सांगितले की, मी गेल्या १२ वर्षांपासून ओमानमध्ये राहत आहे. मी पहिलं बिग तिकीट दोन वर्षांपूर्वी खरेदी केलं होतं. मला तारीख लक्षात नाही परंतु, ते तिकीट केवळ खातं उघडण्यासाठी मी खरेदी केलं होतं. मी आणि माज्या काही मित्रांनी ते तिकीट खरेदी करण्यासाठी पैसे जमा केले हते.

परंतु, आमच्या नशिबानं आमची साथ दिली नाही त्यामुळे ही यात सहभागी होणं बंद केले होते. यंदा मात्र रंजीतचं भाग्य उजळलं. आपण जिंकलेली रक्कम आपल्या पाच मित्रांसोबत शेअर करणार असल्याचंही रंजीतनं म्हटलंय. तिकीट खरेदीसाठी याच मित्रांनी योगदान दिल्याची आठवण रंजीतला कायम आहे. रंजीत विवाहीत असून त्याला एक पाच वर्षांची मुलगी आहे..

Bade Dilwala, after winning the lottery of Rs Rs 20 crore divide into five friends

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात