विशेष प्रतिनिधी
मुंबई : हृदयरोगाने आजारी असलेल्या दोन महिन्यांच्या बाळाने कोरोनावर यशस्वी मात केली. नंदुरबारमध्ये स्थायिक असलेल्या अगरवाल कुटुंबाला कन्यारत्न झाले;Baby child defeated corona
पण अवघ्या एका महिन्यात या बाळाला हृदयरोग असल्याचे समोर आले. त्यानंतर डॉक्टरांनी नातेवाइकांना बाळाला मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते.
एक महिन्याच्या मुलीचे वजन रुग्णालयात भरती करतेवेळी फक्त तीन किलो होते. मुलीला जन्मजात हृदयविकार असल्याचे आढळून आले. या आजाराला ‘ऑब्स्ट्रॅक्टेड टोटल अनोमलस पल्मनरी वेनस कनेक्शन’ (टीएपीव्हीसी) म्हणतात.
बाळाला जेव्हा रुग्णालयात भरती केले तेव्हाच ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत कार्डियाक सर्जरीनंतरच्या परिणामांवर विपरीत प्रभाव पडण्याची शक्यता असते.
त्यामुळे शस्त्रक्रिया दोन आठवड्यांनंतर केली. कोरोनाच्या दृष्टीने दोन आठवड्यांचा काळ सुरक्षित मानला जातो. त्यामुळे दोन आठवड्यांनी कोरोनामधून बरी झाल्यानंतर या मुलीला शस्त्रक्रियेसाठी नेले.
अतिशय गुंतागुंतीची ‘ओपन हार्ट करेक्टिव्ह कार्डियाक’ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर मुलीच्या तब्येतीत सुधारणा झाली. उपचार, शस्त्रक्रिया यासाठी जवळपास महिनाभर रुग्णालयात राहिल्यानंतर मुलगी घरी परतली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App