विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बल्गेरियाच्या बाबा वँगा नावाने परिचित असलेल्या दृष्टिहीन वँगेलिया पांडव गुस्टेरोवा यांनी 2022 वषार्साठी धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. भारतातील तापमान 50 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असेल. यामुळे पिकांवर नाकतोड्यांचा हल्ला होईल, त्यामुळे भारतात दुष्काळ पडेल.Baba Vanga’s Dangerous Prophecy, Great Hunger Crisis in India in 2022, Aliens Attack
बाबा वँगा यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वीच जगाबद्दल विविध भाकीते करून ठेवली आहेत. 2022 मध्ये जगातील प्रमुख शहरे पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे प्रभावित होतील, नद्यांच्या प्रदूषणामुळे पाण्याची कमतरता भासेल. 2022 मध्ये लोक आपला जास्तीत जास्त वेळ स्क्रीनवर घालवतील,
म्हणजेच लोक संगणक आणि मोबाईलवर अधिक वेळ घालवतील, असा अंदाजही बाबा वँग यांनी व्यक्त केला आहे. संशोधकांचा एक समूह सयबेरियामध्ये एका जीवघेण्या विषाणूचा शोध लावेल. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या वितळतील आणि हा विषाणू मुक्त होईल. त्यानंतर परिस्थिती अनियंत्रित होईल, असे म्हटले आहे.
बाबा वँगा यांच्या मते, 2022 मध्ये जगात भूकंप आणि त्सुनामीचा धोका वाढेल. हिंदी महासागरात भूकंपानंतर मोठी त्सुनामी येईल, याचा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया आणि भारतासह जगातील देशांच्या किनारी भागांना मोठा फटका बसेल. या त्सुनामीत शेकडो लोकांचा मृत्यू होईल. एलियन्सकडून ओमुआमुआ नावाचा एक लघुग्रह पृथ्वीवर पाठवला जाईल, असा दावाही त्यांनी केला आहे.
‘बाल्कनचा नॉस्ट्राडेमस’ म्हणून ओळखल्या जाणारा दृष्टीहीन बाबा वँगा यांनी 2022 वषार्साठी केलेल्या भविष्यवाण्यांनी इंटरनेटवर जगतात खळबळ उडाली आहे. यापूर्वी त्यांनी 9/11 चा हल्ला आणि ब्रेक्झिट संकटाची अचूक भविष्यवाणी केली होती. सोव्हिएत युनियनचे विघटन, 2001 मधील 11 सप्टेंबरचा हल्ला, प्रिन्सेस डायनाचा मृत्यू आणि चेरनोबिल आपत्ती संदभार्तील त्यांचे दावे सत्य सिद्ध झाले आहेत.
वयाच्या 12 व्या वर्षीच वँगेलिया पांडव गुस्टेरोवा यांनी आपली दृष्टी गमावली. आपल्याला भविष्याकडे बघण्यासाठी देवाकडून ही एक देणगी मिळाली असल्याचा दावा त्यांनी केला होता. 1996 मध्ये वयाच्या 85 व्या वर्षी मृत्यूपूर्वी त्यांनी 2022 संदर्भात धक्कादायक भविष्यवाणी केली होती. असे म्हटले जाते, की बाबा वेंगा यांनी केलेल्या जवळपास 85 टक्के भविष्यवाण्या सत्य सिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या भविष्यवाण्यांमध्ये 5079 पर्यंतचा उल्लेख आढळतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App