पुण्यातील अनंतवेद आयुर्वेद गेल्या अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक क्षेत्रात संशोधन करत आहेत. आयुर्वेदिक सिगारेट विकसित करणाऱ्या त्यांच्या या संशोधनाला भारतीय पेटंट मिळाले आहे. संशोधक डॉ. राजस नित्सुरे यांनी ही माहिती दिली आहे.Ayurvedic cigarettes manufactured in Pune have been patented.
विशेष प्रतिनिधी
पुणे : धूम्रपान आरोग्यासाठी हानीकारक आहे .याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला ठाऊक आहेत, त्यामुळे धूम्रपान करण्याचा सल्ला कोणी देत नाही.मात्र आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या धुम्रपानाचा शोध लागला आहे. पुण्यामध्ये तयार झालेल्या आयुर्वेदिक सिगारेटला पेटंट मिळाले आहे .
तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही सिगारेट आहे.
पुण्यातील अनंतवेद आयुर्वेद गेल्या अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक क्षेत्रात संशोधन करत आहेत. आयुर्वेदिक सिगारेट विकसित करणाऱ्या त्यांच्या या संशोधनाला भारतीय पेटंट मिळाले आहे. संशोधक डॉ. राजस नित्सुरे यांनी ही माहिती दिली आहे. तीन पिढ्यांनी अथकपणे सलग 10 वर्ष याबाबत संधोधन केले आहे. धूम्रपानाच्या व्यसनात अडकलेल्या व्यक्तींना आयुर्वेदिक धुम्रपानाचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. विशेष म्हणजे आपण याचा कधीही वापर करू शकतो आणि बंदही. व्यसनाधीनतेकडून आरोग्य संपन्नतेकडे नेणारे हे संशोधन असल्याचे डॉ राजस सांगतात.
आयुर्वेदिक धुम्रपान ही भारतीय आयुर्वेदातील एक चिकित्सा आहे. त्याचाच वापर करून आयुर्वेदिक सिगारेट तयार करण्यात आली आहे. कफसारख्या विकारावर ही एक उपचार पद्धती आहे. श्वसनाशी संबंधित आजारावर ही उपचार पद्धती परिणामकारक ठरत असून व्यसनाधीन व्यक्तींना आयुर्वेदिक औषधी गोष्टींचा वापर करुन सिगारेट जर उपलब्ध झाल्यास त्यांची व्यसनातून मुक्तता होऊ शकते. त्याच अनुषंगाने हे संशोधन झाले आणि त्याला अखेर पेटंट प्राप्त झाले.
तीन महिन्यात 60 ते 70 टक्के लोकांची दिवसाला 6 ते 7 सिगारेट ओढण्याची सवय कमी झाल्याचं संशोधनात आढळून आलं असून एकूण हे संशोधन यशस्वी ठरलं असल्याचं डॉ. राजस नित्सुरे यांनी सांगितलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App