विशेष प्रतिनिधी
लखनौ : अयोध्या ही प्रभूरामचंद्रांची जन्मभूमी आहे. श्रीरामाविना अयोध्या हा विचारही करू शकत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. रामाविना अयोध्या ही अयोध्या कशी असू शकेल. जिथे प्रभू रामचंद्र तीच अयोध्या… अयोध्या हीच श्रीरामांची नगरी आहे अणि हीच ती नगरी आहे, असेही ते म्हणाले.Ayodhya without Rama, not Ayodhya, the statement of President Ramnath Kovind
राष्ट्रपतींनी अयोध्येला भेट दिली आणि रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राममंदिरासाठी सुरू असलेल्या बांधकामाचीही पाहणी केली. आपल्या नावाचा संदर्भ देऊन राष्टपती म्हणाले, माझ्या आईवडिलांनी जेव्हा माझे नाव ठेवले, तेव्हा त्यांच्या मनातही रामाविषयी अपार श्रद्धा होती. राम या नावाचे असंख्य लोक आहेत. कारण, या प्रत्येकांच्या माता-पित्यांची रामावर श्रद्धा आहे.
श्रीराम आणि अयोध्या हे परस्परांपासून वेगळे असूच शकत नाही. राम म्हणजेच अयोध्या आणि अयोध्या म्हणजेच राम होय. अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर व्हावे, ही कोट्यवधी नागरिकांची इच्छा होती आणि आता ती पूर्ण होत आहे, असेही राष्ट्रपतींनी सांगितले.
अयोध्या या नावातच शक्तीकेंद्र आहे, रघुवंशी राजांचे सत्ताकेंद्र असल्यामुळे हे नाव आजही औचित्यपूर्ण आहे, असे सांगताना राष्ट्रपती म्हणाले की, श्रीरामांना आदिवासींबाबत विशेष स्नेह होता. त्यांच्या वनवासाच्या काळात त्यांनी युद्धाकरिता अयोध्या आणि मिथिलेची सेना बोलावली नव्हती, तर भिल्ल आणि वानरांना एकत्र करून त्यांची सेना तयार केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App