हमीद अन्सारी, मनमोहन सिंग, मुरली मनोहर जोशी यांचे घरातून मतदान; निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा लाभ!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातल्या वयोवृद्ध व्यक्तींना आपल्या घरातूनच मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली या सुविधेचा लाभ घेत माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुरली मनोहर जोशी या तीन वयोवृद्ध नेत्यांनी आज घरातूनच मतदान केले. avail home voting facility from New Delhi Parliamentary Constituency

80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि कुठलीही शारीरिकशहालचाल करू न शकणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तींसाठी नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने काही विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घरातूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी एक विशिष्ट फॉर्म भरावा लागतो, तो फॉर्म भरल्यानंतर निवडणूक आयोगाचे काही अधिकारी मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान नोंदवून घेतात. या मतदानाची मोजणी प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी होणार आहे.

हमीद अन्सारी, मनमोहन सिंग आणि मुरली मनोहर जोशी या तिन्ही वयोवृद्ध नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या या सुविधेचा लाभ घेत आपापल्या घरांमधूनच आज मतदान केले हे तीनही नेते राजधानी दिल्लीतल्या वेगवेगळ्या मतदारसंघामधले मतदार आहेत.

avail home voting facility from New Delhi Parliamentary Constituency

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात