सेवा शुल्क आकारण्यास हॉटेल, रेस्तराँना प्राधिकरणाची मनाई, सेवा शुल्क वगळण्याचा ग्राहकाला हक्क

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : हॉटेल आणि रेस्तराँ यापुढे ग्राहकांकडून सेवा शुल्क आकारू शकणार नाहीत. याबाबतच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) अनुचित व्यापार पद्धती व सेवा शुल्क आकारणीसंदर्भात ग्राहक हक्कांचे उल्लंघन रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.Authorization of hotels, restaurants to charge service charges, right of customer to waive service charges

यानुसार हॉटेल्स वा रेस्तराँ जेवणाच्या बिलामध्ये डिफॉल्टनुसार सेवा शुल्क जोडणार नाहीत. इतर कोणत्याही वस्तूसाठी सेवा शुल्क वसूल केले जाणार नाही.



कोणतेही हॉटेल किंवा रेस्तराँ ग्राहकाला सेवा शुल्क भरण्यास भाग पाडू शकत नाही. सेवा शुल्क ऐच्छिक, पर्यायी, ग्राहकाच्या विवेकानुसार असेल हे ग्राहकाला सांगितले पाहिजे. हॉटेल आणि रेस्तराँ जेवण बिलामध्ये सेवा शुल्क जोडून व एकूण रकमेवर जीएसटी आकारून शुल्क आकारू शकत नाहीत, असेही म्हटले आहे.

अशी करू शकता तक्रार

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन 1915 वर कॉल करून किंवा अॅपद्वारे तक्रारी केल्या जाऊ शकतात. तपास आणि कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार ( तक्रारी सीसीपीएला com-ccpa@nic.in या) ई-मेलद्वारे देखील पाठवता येतील.

Authorization of hotels, restaurants to charge service charges, right of customer to waive service charges

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात