विशेष प्रतिनिधी
व्हिएन्ना : युरोपीय युनियनच नव्हे तर जगभरातील नेते अफगाण निर्वासितांसाठी दरवाजे खुले करण्याचे आवाहन करीत असताना ऑस्ट्रियाने त्यास ठाम नकार दर्शविला आहे. Austiya will not entry to Afghan people
चान्सेलर सेबॅस्टियन कुर्झ यांनी हे ठामपणे सांगतानाच त्यामागील भूमिका स्पष्ट केली. एकात्मतेच्या प्रक्रियेतील अडचणी आणि यापूर्वीच प्रवेश दिलेल्या अफगाण निर्वासितांची संख्या अशी दोन कारणे त्यांनी दिली. त्यांनी पाठोपाठ ट्विट केली. त्यांनी म्हटले आहे की, आता आम्ही आणखी अफगाण निर्वासितांना आत घेऊ शकणार नाही. यापूर्वीच ४४ हजार अफगाण नागरिकांना आत घेऊन संतुलन बिघडेल इतके जास्त योगदान दिले आहे, जे अयोग्य आहे.
दरडोई निकष लावल्यास इराण, पाकिस्तान आणि स्वीडन यांच्यानंतर अफगाण समुदाय ऑस्ट्रियात मोठा आहे. अजूनही त्यांच्या एकात्मतेच्या प्रक्रियेत मोठे अडथळे आहेत. त्यामुळे आणखी निर्वासित घेण्याच्या आम्ही विरोधात आहोत. आमच्या शेजारी देशांनी त्यांना मदत करावी. युरोपीय युनियनने बाह्य सीमा सुरक्षित करून अवैध स्थलांतर मानवी तस्करी रोखलीच पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App