1 ऑगस्ट 2023 : तेलंगणातून महाराष्ट्रात येऊन केसीआर मोदींना आव्हान देणार; तर पवार मोदींबरोबर व्यासपीठावर बसणार!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उद्या 1 ऑगस्ट 2023 लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती या कार्यक्रमांच्या निमित्ताने मोदीविरोधकांमध्ये फार मोठी फाटाफूट पडल्याचे दिसणार आहे. कारण तेलंगणातून महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देणार आहेत आणि त्याचवेळी पुण्यातल्या कार्यक्रमात शरद पवार मोदींशेजारी व्यासपीठावर बसणार आहेत.August 1 2023 KCR will come to Maharashtra from Telangana and challenge Modi So Pawar will sit on the dais with Modi!!

तेलंगणचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव उद्या अण्णाभाऊ साठे जयंतीच्या कार्यक्रमासाठी अण्णाभाऊंचे जन्मस्थान जन्मगाव वाटेगाव मधल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर ते शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांची भेट घेऊन त्यांना आपल्या भारत राष्ट्र समितीत येण्याचे आवाहन करणार आहे.



केसीआर यांचा उद्याचा महाराष्ट्र दौरा भारत राष्ट्र समितीच्या संघटनात्मक वाढीसाठी जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढाच तो काँग्रेस – राष्ट्रवादी सारख्या पक्षांसाठी स्वतःच्या पक्षातली फूट रोखण्यासाठी महत्त्वाचा आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते आपापले पक्ष सोडून भारत राष्ट्र समितीत जाऊ नयेत यासाठी राजकीय बांधबांधिस्ती करण्याचा काँग्रेस – राष्ट्रवादीचे बडे नेते प्रयत्न करीत आहेत. आता या प्रयत्नांना किती यश मिळते??, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

पण एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकमान्य टिळक पुरस्काराचा कार्यक्रम पुण्यात होत असताना त्याच दिवशी के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रात येऊन अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगावातून त्यांना आव्हान देणार आहेत, पण त्याचवेळी पुण्यातल्या टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमात मात्र शरद पवार मोदींशेजारी व्यासपीठावर बसणार आहेत. पवारांचे कार्यकर्ते मात्र टिळक चौकात मोदी विरोधात निदर्शने करणार आहेत.

या दोन्ही कार्यक्रमांमुळे शरद पवारांच्या एकूण राजकीय भूमिकेविषयी प्रचंड संशय व्यक्त होत असून त्यांनीच पाठबळ दिलेल्या पुरोगाम्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

शिवाय तेलंगणाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन मोदींना आव्हान देतात आणि पवार मात्र विरोधकांना बळ देण्याऐवजी मोदींच्याच कार्यक्रमात जाऊन मोदींशेजारी बसतात, ही फार मोठी राजकीय विसंगती या निमित्ताने तयार होणार आहे.

राऊत, वंदना चव्हाण पवारांवर नाराज

उद्याच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीतल्या पवार गोटाच्याच खासदार वंदना चव्हाण यांनी “वैयक्तिक” नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी मोदींच्या बाजूने भूमिका घेऊ नये, त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होतो, असे शरसंधान संजय राऊत यांनी पवारांवर साधले, तर वंदना चव्हाण यांनी मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा पवारांचा निर्णय आपल्याला वैयक्तिकरित्या पटलेला नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली.

August 1 2023 KCR will come to Maharashtra from Telangana and challenge Modi So Pawar will sit on the dais with Modi!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात