सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगड घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा, अशाा इशारा भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला दिला आहे. राम मंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे, अशोही त्यांनी म्हटले आहे.Atul Bhatkhalkar’s warning to Shiv Sena
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगड घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा, अशाा इशारा भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला दिला आहे. राम मंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे, अशोही त्यांनी म्हटले आहे.
अयोध्येतील राम मंदिर निमार्णात कथित जमीन घोटाळाप्रकरणी शिवसेनेकडून आरोप केले जात आहेत. शिवसेनेने म्हटले आहे, की राम मंदिर निमार्णात काही घोटाळा झाला असेल, तर त्यात स्वत: पंतप्रधान मोदींनी लक्ष घालायला हवे. शिवसेनेचे मुखपत्र अशालेल्या सामनामध्ये म्हटले आहे,
की राम मंदिर कामाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि प्रामाणिकपणे व्हायरल हवी. कारण ती एक राष्ट्रीय गौरवाची गोष्ट आहे. या वरून भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की , काँग्रेस , शिवसेना आदी विरोधकांनी केलेले आरोप बोगस होते हे उघड झाले आहे.
सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा.लोकांनी श्रद्धा आणि विश्वासाने राम मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत, त्याचा व्यवस्थित हिशोबही ठेवला जातो. शिवसेनेला विश्वास नसेल तर त्यांनी दिलेले एक कोटी परत मागावे. त्यातून एखादी टिपूची मजार बांधावी. शिवसेनेच्या जीवावर मंदिर निर्माण सुरू नाही, अशोही त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App