देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या निवासस्थानी एका अज्ञात व्यक्तीने घुसण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला रोखले आणि ताब्यात घेतले. याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. दिल्ली पोलिस सूत्रांनी ही माहिती दिली. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार तो मानसिक आजारी आहे आणि किरायाची गाडी चालवत होता. आरोपी व्यक्ती त्याच गाडीत बसून घरात घुसण्याचा प्रयत्न करत होता. दिल्ली पोलिसांचा विशेष कक्ष त्याची चौकशी करणार आहे.Attempt to break into NSA Ajit Dovals house, the accused said Someone is controlling the body with a chip
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या निवासस्थानी एका अज्ञात व्यक्तीने घुसण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला रोखले आणि ताब्यात घेतले. याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. दिल्ली पोलिस सूत्रांनी ही माहिती दिली. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार तो मानसिक आजारी आहे आणि किरायाची गाडी चालवत होता. आरोपी व्यक्ती त्याच गाडीत बसून घरात घुसण्याचा प्रयत्न करत होता. दिल्ली पोलिसांचा विशेष कक्ष त्याची चौकशी करणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चौकशीदरम्यान त्या व्यक्तीने दावा केला की त्याच्या शरीरात कोणीतरी चिप घातली आहे आणि त्याला नियंत्रित केले जात आहे. मात्र पोलिसांनी तसे नसल्याचे सांगितले. प्राथमिक तपासात तो मानसिक आजारी असल्याचे समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा त्याला पकडले तेव्हा तो माणूस थोडा बडबडत होता. वृत्तानुसार, तो कर्नाटकातील बंगळुरूचा रहिवासी आहे. दहशतवादविरोधी युनिट आणि पोलिसांच्या स्पेशल सेलकडून त्याची चौकशी सुरू आहे. त्याला ताब्यात घेऊन लोधी कॉलनीतील स्पेशल सेलच्या कार्यालयात आणण्यात आले असून येथे चौकशी सुरू आहे.
डोवाल दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर
NSA अजित डोवाल यांना भारताचे जेम्स बाँडदेखील म्हणतात. ते पाकिस्तान आणि चीनच्या डोळ्यात सतत सलत आहेत. ते नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असतात. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जैशच्या एका दहशतवाद्याकडून डोवाल यांच्या कार्यालयाची रेकी केली जात असल्याचा व्हिडिओ सापडला होता. हा व्हिडिओ त्याने पाकिस्तानातील त्याच्या हँडलरला पाठवला. त्यानंतर डोवाल यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App