मीरा गर्गे-निमकर यांचे निधन


विशेष प्रतिनिधी

पुणे : मीरा गर्गे-निमकर यांचे सोमवारी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हृदय विकाराच्या आजाराने निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात त्यांचे पती , विवाहित मुलगा, सून,विवाहित मुलगी,जावई,नातवंडे आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र मधील निवृत्त अधिकारी दिलीप (मधुसूदन)निमकर यांच्या त्या पत्नी होत. Meera Garge- Nimkar passed away

त्या उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू होत्या. त्यांनी पुण्यातील मॉडर्न प्रशाला,फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठ या तिन्ही संस्थांच्या व्हॉलीबॉल संघाचे राष्ट्रीय स्तरावर सहा वर्षे संघनायक म्हणून प्रतिनिधित्व केले.एम.ए.हिंदी असलेल्या मीरा गर्गे -निमकर या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमधून शिक्षक म्हणून निवृत्त झाल्या होत्या.उत्कृष्ट निवेदिका म्हणून कर्वे संस्था आणि पुणे मेट्रो रोटरी क्लब मध्ये प्रसिद्ध होत्या. प्रख्यात समाज विज्ञान कोशकार,इतिहासकार,रियासतकार दिवंगत स.मा.गर्गे यांच्या कन्या होत.

Meera Garge- Nimkar passed away

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर