वृत्तसंस्था
लखनौ : धर्मांतर आणि लव्ह जिहादवर हल्लाबोल करा,असा सल्ला उत्तरप्रदेश सरकारला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला असून लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत स्पष्ट संदेश देताना लोकसंख्येत असमतोल राहणार नाही, याची काळजी घ्या, असेही म्हंटले आहे. Attack Conversation and love jihad; Sangh advice to Uttar Pradesh government; Warning of Population Control Act
उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता पुन्हा आणण्याबरोबरच सेवेबरोबरच राष्ट्रवादाचे हत्यार अधिक धारदार करण्याची पूर्ण तयारी झाली आहे. समन्वय बैठकीत योगी सरकारच्या कामगिरीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याशी संबंधित संस्थांनी समाधान व्यक्त केले. सेवेला राजकारणाचा आधार बनविण्याची ही परंपरा सुरू ठेवण्याच्या सल्ल्याबरोबरच धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या विरोधात हल्लाबोल करण्याची सूचना सरकारला दिली. तसेच लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत स्पष्ट संदेश देताना लोकसंख्येत असमतोल राहू नये, यासाठी सावध इशारा दिला आहे.
रविवारी कानपूर रोडवरील सिटी मॉन्टेसरी स्कूलमध्ये सरकार, भाजपा आणि संबंधित संस्थांसह संघाची बैठक झाली. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबोल आणि सहकार्यवाह डॉ.कृष्णा गोपाल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि डॉ. दिनेश शर्मा उपस्थित होते. सरकारकडून होत असलेल्या कामांचा तसेच लोककल्याणकारी योजनाचा आढावा घेतला. कोरोना कालावधीत सरकारने गरीब व गरजूंना रेशन वाटप करण्यापासून इतर काही पावले उचलली यावर चर्चा झाली.
योगी सरकारच्या कामावर समाधान
प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी कार्यक्रम व मोहिमेविषयी माहिती दिली. सूत्रांनी सांगितले की, संघाने सरकार आणि संघटनेच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. अंत्योदय योजनेचे काम कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. राजकारण हे सेवेच्या जोरावर पुढे घेऊन जाणारे आल्याचे ते म्हणाले. संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सरकारच्या या कामाचे कौतुक केले आणि सूचना दिल्या. भाजपाची सत्ता पुन्हा राज्यात आणणे हे समाजाच्या हितासाठी आवश्यक आहे, यावर संघाचा भर होता.
विशेष प्रतिनिधी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App