विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Atishi Marlena दिल्लीच्या दारू घोटाळ्यात सुप्रीम कोर्टाने पूर्ण राजकीय नाड्या आवळल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राजीनामा देणे भाग पडले. त्यानंतर त्यांच्या जागी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोण येणार, याच्या चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाल्या. मात्र त्या चर्चा सुनीता केजरीवाल यांच्यापर्यंत येऊन थांबल्या. अरविंद केजरीवाल हे लालू – राबडी फॉर्म्युला राबवून दिल्लीत सुनीता केजरीवाल यांच्याकडेच मुख्यमंत्री पदाची सूत्रे सोपवीतील, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्याचे एक प्रेशर केजरीवालांवर आले. त्यामुळे केजरीवालांनी अतिशी मार्लेना यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची देऊन टाकली. Atishi Marlena
केजरीवाल यांच्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी मनीष सिसोदिया हे जेष्ठता क्रमानुसार अपेक्षित होते. कारण ते उपमुख्यमंत्री होते. पण ते देखील दिल्लीच्या दारू घोटाळ्यात जेलमध्ये गेल्याने अरविंद केजरीवालांनी त्यांचा ऑप्शन कट केला. त्यानंतर सौरभ भारद्वाज, कैलाश गेहलोत, राखी बिर्ला वगैरे नावे माध्यमांनी चर्चेत आणली. पण यात सर्वाधिक बातम्या अरविंद केजरीवाल हे लालू – राबडी फॉर्म्युला वापरून सुनीता केजरीवाल यांनाच मुख्यमंत्री करणार याच्या होत्या. नोकरशाहीकडून लोकशाहीकडे आलेले अरविंद केजरीवाल हे राजकारणात आल्यावर घराणेशाहीकडे वळल्याची टीका होऊ लागली. भाजपच्या हातामध्ये घराणेशाही वरती टीका करण्याचे आयते हत्यार मिळण्याची शक्यता दिसू लागली.
#WATCH via ANI Multimedia | Atishi to be new Chief Minister of Delhi after Arvind Kejriwal steps down#arvindkejriwal #kejriwal #atishihttps://t.co/nQWKwIDZ2a — ANI (@ANI) September 17, 2024
#WATCH via ANI Multimedia | Atishi to be new Chief Minister of Delhi after Arvind Kejriwal steps down#arvindkejriwal #kejriwal #atishihttps://t.co/nQWKwIDZ2a
— ANI (@ANI) September 17, 2024
त्याबरोबर अरविंद केजरीवालांनी आपला पवित्रा बदलला आणि अतिशी मार्लेना यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची देऊन टाकली. आम आदमी पार्टीच्या विधिमंडळ पक्षा पक्षाची बैठक सकाळी झाली. या बैठकीत अरविंद केजरीवाल यांच्या इच्छेनुसार सर्व आमदारांनी अतिशी मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब केले त्यांना विधिमंडळ पक्षाचे नेता निवडले. दुपारी 4.00 वाजता अरविंद केजरीवाल नायब राज्यपालांना भेटून राजीनामा सादर करणार आहेत. त्यानंतर अतिशी नवीन सरकार स्थापनेचा दावा करतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App