Atishi Marlena अरविंद केजरीवाल यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मांडला प्रस्ताव .
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आतिशी मार्लेना या दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री असतील. आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. केजरीवाल यांचा प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आला. आज संध्याकाळी अरविंद केजरीवाल उपराज्यपालांची भेट घेऊन पदाचा राजीनामा देणार आहेत.
विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव मुख्यमंत्रिपदासाठी ठेवला होता. आमदारांनीही आतिशी यांच्या नावाचे स्वागत केले. आतिशी या आठवड्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. आतिशी या आम आदमी पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. शिवा त्या अरविंद केजरीवाल यांच्या जवळच्या मानल्या जातात. मनीष सिसोदिया तुरुंगात गेल्यानंतर आतिशी यांना शिक्षण मंत्रालयासह अनेक मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या.
UPI : मोठी बातमी : आता यूपीआयने करा 5 लाखांपर्यंतचे टॅक्स पेमेंट; हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांमध्ये एका दिवसात 5 लाखांपर्यंत पेमेंटची सुविधा
आतिशी या आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि मंत्री आहेत. आतिशी यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. पुढे त्यांनी आम आदमी पक्षातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आतिशी सध्या दिल्लीच्या कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांनी दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागासोबत PWD, सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री म्हणून काम केले आहे. आतिशी या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जवळचे मानल्या जातात. आतिशी यांनी २०१२ मध्ये भ्रष्टाचारविरोधी आंदोलनादरम्यान राजकारणात प्रवेश केला आणि आम आदमी पार्टीची पायाभरणी करणाऱ्या लोकांमध्ये त्यांचा समावेश होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App