विरोधकांचा मातम कशासाठी??; वाचा, अतिकने 2008 मध्ये यूपीए सरकार वाचविल्याची कहाणी!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : प्रयागराजचा गँगस्टर माफिया अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची हत्या केल्यानंतर विरोधकांची त्याचे समर्थन तर करायचे नाही, पण योगी सरकारवर टीका साधायची यावरून तारांबळ उडाली आहे. काँग्रेस पासून समाजवादी पार्टी पर्यंत आणि समाजवादी पार्टी पासून तृणमूळ काँग्रेस पर्यंत सर्वच पक्षांच्या नेत्यांची यासाठी राजकीय तारेवरची कसरत चालू आहे. पण या अतीकसाठी एवढा धोसरा का काढला जात आहे? किंवा विरोधक एवढा मातम का करीत आहेत, तर याचे कारण तो अपक्ष पासून ते भाजप सोडून सर्वपक्षीय आमदार – खासदार राहिला होता हे आहे!!  Atiq ahamad saved UPA government in 2008 during Indo – USA nuclear deal crisis

इतकेच नाही तर 2008 मध्ये ज्यावेळी यूपीए सरकार कोसळण्याची पाळी आली होती, तेव्हा हाच तो खासदार अतीक अहमद होता, ज्याने लोकसभेत मतदान करून सोनिया गांधी – डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालचे यूपीए सरकार वाचविले होते.

2004 ते 2009 या कालावधीत यूपीए सरकार डाव्या पक्षांच्या पाठिंबाच्या टेकूवर उभे होते. परंतु याच कालावधीत भारताचा अमेरिकेशी अनुकरण या मुद्द्यावरून काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे फाटले आणि डाव्या पक्ष्यांनी यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यामुळे यूपीए सरकार लोकसभेत अल्पमतात आले होते. त्यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि मित्र पक्षांचे लोकसभेत तब्बल 43 खासदार होते. या सगळ्यांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर यूपीएची सदस्य संख्या 228 पर्यंत खाली आली होती. त्यामुळे सरकार अल्पमतात गेले होते.



पण त्या सरकारला वाचविण्यासाठी मुलायम सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पार्टी पुढे सरसावली आणि समाजवादी पार्टीच्या 36 खासदारांनी यूपीए सरकारच्या अविश्वास ठरावा विरोधात मतदान केले. त्यामुळे ते सरकार वाचले. त्यावेळी हे सरकार वाचावी म्हणून अवघ्या 48 तासांमध्ये 6 गुंड माफिया खासदारांना वेगवेगळ्या तुरुंगांमधून सोडवून आणून यूपीए सरकारने लोकसभेत हजर ठेवले होते. यापैकी एक अतीक अहमद हा एक खासदार होता.

नेहरूंच्या फुलपूरचा खासदार

2004 मध्ये समाजवादी पक्षाच्या तिकिटावर तो फुलपुर या कधीकाळी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रतिनिधित्व केलेल्या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेला होता. 1952 च्या पहिल्या निवडणुकीत नेहरूंनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. त्याच फुलपुर मतदार संघात 2004 मध्ये अतीकने निवडणूक जिंकली होती. त्याचे एक मत यूपीए सरकार वाचविण्यासाठी कारणीभूत ठरले होते.

अतीकचे सर्वपक्षीय संबंध

त्यानंतर अतीकने बहुजन समाज पार्टी, अपना दल या पक्षांमधून निवडणूक लढवून आमदारकी पटकावली होती. पण समाजवादी पार्टी त्याचा दबदबा कायम राहिला होता. आज जेव्हा अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची हत्या झाली आहे त्यावेळी देशातले सर्व विरोधी पक्ष लोकशाहीची हत्या झाला असा धोसरा काढत आहेत, पण प्रत्यक्षात अतीक मेल्याचे त्यांना दुःख आहे.

Atiq ahamad saved UPA government in 2008 during Indo – USA nuclear deal crisis

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात