वृत्तसंस्था
वॉशिंग्टन :Sunita Williams भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर परतण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. नासाने मंगळवारी सांगितले की, आता अंतराळवीरांना किमान मार्च 2025 अखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. ही तारीख एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत वाढू शकते.Sunita Williams
नासाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सला उड्डाणासाठी नवीन कॅप्सूल बनवायचे आहे, त्यासाठी वेळ लागेल. नासाच्या म्हणण्यानुसार अंतराळवीरांच्या सुरक्षित परतीसाठी एक कॅप्सूल बनवण्यात येत आहे. हे काम मार्चअखेर पूर्ण होऊ शकेल, त्यानंतरच अंतराळात अडकलेल्या अंतराळवीरांना परत आणता येईल.
सुनीता विल्यम्स 5 जून रोजी बुच विल्मोरसोबत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेल्या होत्या. त्यांचा प्रवास फक्त 8 दिवसांचा होता, पण अंतराळ यानात बिघाड झाल्यामुळे त्या पृथ्वीवर परत येऊ शकल्या नाहीत. दोन्ही अंतराळवीर अवकाशात अडकून सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे.
यापूर्वी, नासाने माहिती दिली होती की सुनीता आणि बुच विल्मोर यांना फेब्रुवारी 2025 मध्ये एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टद्वारे परत आणले जाईल.
यापूर्वी 17 डिसेंबर रोजी नासाने सुनीता आणि डॉन पेटिट यांचा फोटो सोशल मीडिया पोस्टद्वारे शेअर केला होता. चित्रात, दोन्ही अंतराळवीर ख्रिसमसबद्दल उत्साही दिसत होते आणि त्यांनी सांता कॅप परिधान केली होती. NASA ने “Another day, another sleigh” या मथळ्यासह ही पोस्ट शेअर केली आहे.
सुनीता आणि विल्मोर यांना स्पेस स्टेशनवर का पाठवण्यात आलं?
सुनीता आणि बुश विल्मोर हे बोइंग आणि नासाच्या संयुक्त ‘क्रू फ्लाइट टेस्ट मिशन’वर गेले होते. यामध्ये सुनीता या यानाची पायलट होती. त्यांच्यासोबत आलेले बुश विल्मोर हे या मिशनचे कमांडर होते. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) मध्ये 8 दिवस राहून दोघेही पृथ्वीवर परतणार होते.
प्रक्षेपणाच्या वेळी, बोईंग डिफेन्स, स्पेस अँड सिक्युरिटीचे अध्यक्ष आणि सीईओ टेड कोलबर्ट यांनी याला अंतराळ संशोधनाच्या नवीन युगाची उत्तम सुरुवात म्हटले. अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावर घेऊन जाण्याची आणि त्यांना परत आणण्याची अंतराळयानाची क्षमता सिद्ध करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.
अंतराळवीरांनाही अवकाश स्थानकावर 8 दिवसांत संशोधन आणि अनेक प्रयोग करावे लागले. सुनीता आणि विल्मोर हे पहिले अंतराळवीर आहेत, ज्यांना ॲटलस-व्ही रॉकेटचा वापर करून अंतराळ प्रवासासाठी पाठवण्यात आले होते. या मोहिमेदरम्यान त्यांना अंतराळयानही हाताने उडवावे लागले. उड्डाण चाचणीशी संबंधित अनेक प्रकारची उद्दिष्टेही पूर्ण करावी लागली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App