ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येच्या आरोपात अटक केली आहे. सुशील कुमारला एका महिला खेळाडूने मदत केल्याचे चौकशीत समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात रविवारी एक स्कुटी जप्त केली आहे. ही स्कुटी पश्चिम दिल्लीमध्ये राहणाऱ्या एका महिला खेळाडूची असल्याचे तपासात उघड झाले आहे.Assistance to female wrestler Sushil Kumar, accused in murder, Sagar Dhankhad murder case
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑ लिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येच्या आरोपात अटक केली आहे. सुशील कुमारला एका महिला खेळाडूने मदत केल्याचे चौकशीत समोर आले आहे.
दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात रविवारी एक स्कुटी जप्त केली आहे. ही स्कुटी पश्चिम दिल्लीमध्ये राहणाऱ्या एका महिला खेळाडूची असल्याचे तपासात उघड झाले आहे.
सुशील कुमार आणि अजय कुमार हे शनिवारी रात्री या महिला खेळाडूच्या घरी थांबले होते. त्यानंतर ते स्कुटीने दुसरीकडे जाणार होते. ही महिला हँडबॉल खेळाडू असून तिने दोन वेळा एशियन गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आता या महिलेची चौकशी होणार आहे.सुशील कुमार आणि सागर धनखड यांच्यात पैशाच्या व्यवहारावरून वाद होते. त्यातूनच त्याने सागरला मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर सुशील कुमार दोन आठवडे फरार होता.
त्याच्यावर पोलिसांनी १ लाखाच्या बक्षीसाची घोषणाही केली होती. सुशील कुमारने या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धावही घेतली. मात्र, त्याला अटकपूर्व जामीन मिळाला नाही.
डोक्यावर बोथट वस्तूने वार केल्यामुळे सागरचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या मते शरीरावर आढळलेल्या सर्व खुणा मृत्यूच्या अगोदरच्या आहेत. हत्येचा आरोप असल्याने सुशील कुमार याला पुढील आदेश येईपर्यंत रेल्वेने वरिष्ठ कमर्शियल मॅनेजर पदावरून निलंबित केले आहे.
सुशीलचे निलंबन २३ मे पासून लागू करण्यात आले असून पुढील आदेश येईपर्यंत तो निलंबित राहील. हत्येच्या आरोपावरून सुशील कुमारविरोधात चौकशी सुरू झाल्यानंतरच रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App