Assembly Elections : भाजपाने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसाठी उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर!

BJP Foundation Day Amit Shah-JP Nadda Wishes Party workers, PM Modi will address

भाजपा केंद्रीय निवडणूक समितीची  बैठक पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात पार पडल्यानंतर झाली घोषणा.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : या वर्षाच्या अखेरीस देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने भाजपा, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकांसंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक बुधवारी पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात झाली. या बैठकीत दोन्ही राज्यातील निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, भाजपाने गुरुवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. Assembly Elections BJP announced the first list of candidates for Madhya Pradesh and Chhattisgarh

या बैठकीत पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्यासह सर्व नेते सहभागी झाले होते. दोन्ही राज्यांच्या निवडणुकांशिवाय इतर अनेक मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाली. त्यानंतरच आधी राजस्थानमध्ये भाजपची निवडणूक टीम जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली.

छत्तीसगडमध्ये भाजपाने विधानसभेच्या २१ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्याच वेळी, मध्य प्रदेशसाठी भाजपने 39 जागांसाठी दावेदार जाहीर केले आहेत. पाटण विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या विरोधात खासदार विजय बघेल यांना तिकीट देण्यात आले आहे. विजय बघेल हे दुर्ग लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.

Assembly Elections BJP announced the first list of candidates for Madhya Pradesh and Chhattisgarh

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात