अफगाणिस्तानचा संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला मात्र त्यांना तिन्ही वेळेस रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनमध्ये सुरू असलेल्या आशिया स्पर्धेत भारतीय खेळडूंची यशस्वी घौडदोड आणि पदकं जिंकण्याचा धडका सुरूच आहे. त्याता भारतीय क्रिकेट संघानेही भर टाकली आहे. कारण भारतीय क्रिकेट संघानेही देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. विशेष म्हणजे अफगाणिस्तानसोबतचा अंतिम सामना पावसामुळे रद्द होऊनही भारतीय संघाला सुवर्णपदक मिळाले आहे. Asian Games Indian cricket team won the gold medal even though the match was canceled due to rain
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. ICC T20 क्रमवारीच्या आधारे भारताला विजेता घोषित करण्यात आले. या क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे. तर, अफगाणिस्तान दहाव्या स्थानावर आहे.
एशियाडमध्ये भारताची प्रथमच 100 पदके; यात 25 सुवर्णांचा समावेश, आज 3 सुवर्णांसह 5 पदके जिंकली
भारतीय पुरुष क्रिकेट संघ प्रथमच एशियाडमध्ये सहभागी होण्यासाठी आला होता. त्याने पहिल्याच प्रयत्नात इतिहास रचला आणि सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी 2010 मध्ये बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून सुवर्णपदक जिंकले होते, तर 2014 मध्ये श्रीलंकेने अफगाणिस्तानला हरवून सुवर्णपदक जिंकले होते. अफगाणिस्तानचा संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आणि त्यांना तिन्ही वेळेस रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
या सामन्यात भारतीय कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा अफगाणिस्तानने 18.2 षटकात 5 विकेट गमावत 112 धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसामुळे सामना होऊ शकला नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App