वृत्तसंस्था
होंगजू : चीन मधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आजचा दिवस भारतासाठी सर्वोत्तम शनिवार ठरला. टेनिस, टेबल टेनिस, अथलेटिक्स, स्क्वाश या सर्व क्रीडा प्रकारांमध्ये भारत आणि पदकांची लयलूट केली, इतकेच नाही तर टेबल टेनिस मध्ये चीनचे पाच दशकांचे वर्चस्व संपुष्टात आणले, तर हॉकीत भारतीय टीमने पाकिस्तानचा 10 – 2 असा प्रचंड धुव्वा उडवला. Asian Games 2023 Today was the best Saturday for India
19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 7 व्या दिवशीचा हॉकीमध्ये भारताने पाकिस्तानवर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा विजय नोंदविला. भारतीय संघाने पूल-ए लीग सामन्यात पाकिस्तानचा 10 – 2 असा पराभव केला. भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीतने 4 गोल केले. भारताने प्रथमच पाकिस्तानविरुद्ध 10 गोल केले आहेत.
शनिवारी चीनमधील होंगजू येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 5 पदके जिंकली. यामध्ये 2 सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदकांचा समावेश आहे. शनिवारी स्क्वॉशच्या सांघिक स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करून पहिले सुवर्णपदक जिंकले.
भारताने एकूण 10 सुवर्णपदके जिंकली आहेत. आता भारताची पदकसंख्या 38 झाली आहे. यामध्ये 10 सुवर्ण, 14 रौप्य आणि 14 कांस्यपदकांचा समावेश आहे. भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
अॅथलेटिक्सच्या 10 हजार मीटर शर्यतीत भारतीय धावपटू कार्तिक कुमारने (28:25:38 मिनिटे) रौप्य आणि गुलवीर सिंग (28:17.21 मिनिटे) याने कांस्यपदक जिंकले. बहरीनच्या बिहारनू बालेवने (28:13.62 मिनिटे) सुवर्ण जिंकले.
पाकिस्तान विरुद्ध सर्वोत्तम कामगिरी
मनदीप सिंगने 8व्या मिनिटाला, हरमनप्रीत सिंगने 11 व्या, 17 व्या, 33 व्या आणि 34 व्या मिनिटाला, सुमितने 30 व्या मिनिटाला, वरुणने 44 व्या मिनिटाला, शमशेर सिंगने 46 व्या मिनिटाला आणि एल. के. उपाध्यायने 49व्या मिनिटाला गोल केले. पाकिस्तानसाठी एम. एस. खानने 38 व्या मिनिटाला आणि राणा आवाने 45 व्या मिनिटाला गोल केले.
भारतीय नेमबाजांनी सुवर्णपदकाच्या लढतीत चीनविरुद्ध 16-14 अशा गुणांसह रौप्यपदक जिंकले.
आज दोन सुवर्ण आणि एक रौप्य
सुवर्ण (स्क्वॉश) : स्क्वॉशमध्ये भारतीय पुरुष संघाने पाकिस्तानचा 2-1 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. सुवर्णपदक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानच्या नासिर इक्बालने महेश माणगावकरचा 3-0 असा पराभव केला. दुसरा सामना भारताच्या नावावर होता. सौरव घोषालने असीम मुहम्मदचा 3-0 असा पराभव केला तर तिसऱ्या सामन्यात अभय सिंगने नूर जमानचा 3-2 असा पराभव केला. अशा प्रकारे भारताने अंतिम सामना 2-1 ने जिंकला.
सुवर्ण (टेनिस) : रोहन बोपन्ना आणि रुतुजा भोसले यांनी टेनिस मिश्र दुहेरीत चायनीज तैपेईच्या अन-शुओ लियांग आणि त्सुंग-हाओ हुआंग यांच्याविरुद्धचा तिसरा सेट टायब्रेकरमध्ये जिंकून सुवर्णपदक जिंकले. भारतीय जोडीने अंतिम फेरीत चायनीज तैपेई जोडीचा 2-6, 6-3, [10] – [4] असा पराभव केला.
रौप्य (शूटिंग) : नेमबाजीमध्ये, सरबज्योत सिंग आणि दिव्या टीएस यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. नेमबाजीच्या सुवर्ण लढतीत सरबजोत आणि दिव्याला चीनच्या झांग बोवेन आणि जियांग रॅनक्सिन जोडीकडून 16-14 असा पराभव स्वीकारावा लागला. यासह त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
रौप्य (10 हजार मीटर रेस वॉक) : भारतीय धावपटू कार्तिक कुमार (28:25:38 मिनिटे) याने ऍथलेटिक्समधील 10 हजार मीटर शर्यतीच्या चालीत रौप्यपदक जिंकले.
कांस्य (10 हजार मीटर रेस वॉक): भारताच्या गुलवीर सिंगने २८:१७.२१ मिनिटांच्या वेळेसह १० हजार मीटर रेस वॉकमध्ये कांस्यपदक जिंकले.
नेमबाजीत भारताने 19 पदके जिंकली
हँगझोऊ एशियाडमध्ये भारताच्या खात्यात आता 19 पदके आहेत. ज्यामध्ये 6 सुवर्ण, 8 रौप्य, 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. खेळांच्या 72 वर्षांच्या इतिहासातील ही आपली सर्वोत्तम नेमबाजी कामगिरी आहे. नेमबाजांनी 2006 च्या गेम्सचा विक्रम मोडला. त्यावेळी दोहा गेम्समध्ये नेमबाजीत 3 सुवर्ण, 5 रौप्य आणि 6 कांस्य अशी एकूण 14 पदके जिंकली होती.
बॉक्सिंग: लव्हलिना आणि प्रीती उपांत्य फेरीत पोहोचल्या
लव्हलिना बोरगोहेननेही बॉक्सिंगच्या 75 किलो गटात उपांत्य फेरी गाठली आहे. लव्हलिनाने उपांत्यपूर्व फेरीत कोरियाच्या सुयेन सेओंगचा 5-0 असा पराभव केला. यासह तिने पदक निश्चित केले.
यापूर्वी प्रीती पवारने बॉक्सिंगच्या 54 किलो गटात उपांत्य फेरी गाठली होती. प्रितीने उपांत्यपूर्व फेरीत कझाकिस्तानच्या झैना शेरबेकोवाचा 4-1 असा पराभव करून पदक मिळवले. यासह तिने पॅरिस ऑलिम्पिक कोटाही गाठला.
ॲथलेटिक्स मध्ये 5 खेळाडू अंतिम फेरीत
मुरली शंकर आणि जेसविन ऑल्ड्रिन यांनी पुरुषांच्या लांब उडीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 1500 मीटर शर्यतीत अजय कुमार आणि जिन्सन जॉन्सन यांनीही अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. ज्योती याराजीने महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.
मीराबाई चानू वेटलिफ्टिंगमध्ये
वेटलिफ्टिंग स्पर्धा देखील आजपासून सुरू होणार आहेत, ज्यामध्ये ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू महिलांच्या 49 किलो गटात प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रवेश करणार आहे. चानूसोबतच बिंदयाराणी देवी महिलांच्या 55 किलो वजनी गटात भाग घेणार आहे.
घोडेस्वारीत आणखी पदकाच्या आशा
घोडेस्वार इव्हेंटिंग ड्रेसेजमध्ये पदकाच्या आशा कायम आहेत. आशिष लिमये या फेरीत अव्वल ठरला. विकास कुमार आठव्या तर अपूर्व धमाडे 16व्या स्थानावर राहिला.
सहाव्या दिवशी भारताने 8 पदके जिंकली
शुक्रवारी भारतीय नेमबाजांनी दोन सुवर्ण आणि 3 रौप्यपदकांसह दिवसाची शानदार सुरुवात केली. यानंतर रामकुमार रामनाथन आणि साकेथ मायनेनी या जोडीने टेनिसमध्ये रौप्यपदक पटकावले. त्यानंतर स्क्वॉशमध्ये भारतीय पुरुष संघाने कांस्यपदक जिंकले.
दिवसातील शेवटचे पदक शॉटपुटमध्ये मिळाले. महिलांच्या शॉट पुट प्रकारात किरण बालियानने 17.36 मीटर फेक करून तिसरे स्थान पटकावत कांस्यपदक जिंकले.
यासह भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने नेपाळचा 3-0 असा पराभव करत 37 वर्षांनंतर एशियाड पदक मिळवले. संध्याकाळी बॉक्सर निखत जरीनने 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून पदक मिळवले. इतकेच नाही तर निखतने पॅरिस ऑलिम्पिक-2024 चा कोटाही मिळवला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App