वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नूतन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या सिग्नल डिपार्टमेंटमधील एका इंजिनिअरला एका भेटीदरम्यान चक्क प्रेमाने मिठी मारून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यावेळी त्यांनी कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला. Newly-appointed minister Ashwini Vaishnaw hugs engineer from signal dept of Railways
रेल्वेमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांनी विविध विभागाला भेट देण्यास सुरुवात केली. एका क्षणी त्यांची सिग्नल विभागातील एका इंजिनिअरची भेट झाली. त्या इंजिनिअरने आपला परिचय देताना जोधपूर येथील एमबीएम इंजिनिअरींग कॉलेजचा माजी विद्यार्थी असल्याचे सांगितले. ते ऐकताच वैष्णव म्हणाले ‘ आवो गले लागते है!’ विशेष म्हणजे तो इंजिनिअर ज्या कॉलेजचे नाव सांगत होता त्याच कॉलेजचे तेही माजी विद्यार्थी आहेत. दोघांच्या एकमेकांना मिठी मारल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या भेटीमुळे वैष्णव यांना कॉलेज जीवनातील आठवणीना उजाळा मिळाला. ते म्हणाले, कॉलेजमध्ये असताना ज्युनिअर सिनिअरना ‘बॉस’ म्हणून हाक मारत असत.ते चेष्टेने त्याला म्हणाले, आता आजपासून तू मला ‘बॉस’ असेच म्हण जा.
केंद्रीय मंत्रिमंडळात थेट कॅबिनेट मंत्री म्हणून वैष्णव यांची नियुक्ती झाली आहे. अन्यथा अनेकदा प्रथम राज्यमंत्री आणि नंतर कॅबिनेट मंत्री अशी नियुक्ती केली जाते. या प्रथेला प्रथमच त्यांनी छेद दिला आहे. माजी आयएएस अधिकारी असलेले वैष्णव आयआयटी, खरगपूर आणि व्हारटन बिझनेस स्कूलचे पदवीधारक आहेत.
२०१९ मध्ये ते भाजपतर्फे ओडिशातून राज्यसभेचे खासदार बनले. जोधपूर येथील एमबीएम इंजिनिअरींग कॉलेजमधून त्यांनी १९९१ मध्ये इलेक्ट्रोनिक आणि कम्युनिकेशन इन इंजिनिअरींग या विषयात सुवर्ण पदक पटकावले होते. बालसोर आणि कटक येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले. जिल्ह्यात राबविलेल्या मदत आणि पुनर्वसन या उत्कृष्ट कामाची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली होती.
२०१२ मध्ये त्यांनी कार्पोरेट क्षेत्राला रामराम ठोकला असू गुजरातमध्ये दोन अटोमोबाईल कंपन्या उभारल्या. थ्री टी अटो लॉजिस्टिक प्रायव्हेट लि. आणि व्हि गी अटो कॉम्पोनेन्ट प्रायव्हेट लि., अशी त्यांची नावे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App