प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजस्थानात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गहलोत सर्व बाजूने अडचणीत आले असताना त्यांनी वेगवेगळ्या राजकीय क्लुप्त्या लढवणे चालू ठेवले आहे. त्यातली एक क्लुप्ती अशोक गेहलोत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या वेळी लढवली. Ashok gehlot’s protocol mischief exposed by PMO
पंतप्रधानांच्या राजस्थान मधल्या कार्यक्रमात प्रोटोकॉल नुसार मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना रितसर निमंत्रण असताना आपल्याला निमंत्रण नसल्याचा आणि आपले भाषण वगळल्याचा कांगावा करत अशोक गेहलोत यांनी पंतप्रधानांचे ट्विटरवर खोचक शब्दांत स्वागत केले.
पण गेहलोत त्यांच्या त्या ट्विटला स्पष्ट शब्दांत उत्तर देत पंतप्रधानांच्या कार्यालयाने अशोक गेहलोत यांना पुरते “एक्स्पोज” केले. राजशिष्टाचारानुसार नुसार पंतप्रधानांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला बोलावलेच आहे. पण मुख्यमंत्री कार्यालयानेच तुम्ही येऊ शकणार नाही, असे कळविले, अशी चपराक पंतप्रधान कार्यालयाने अशोक गेहलोत यांना लगावली.
काही मराठी माध्यमांनी मात्र याचे वर्णन राजस्थानातल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री रुसले आणि पंतप्रधान कार्यालयाने त्यांची समजूत काढली, असे करून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या कुरापतीत भर घातली आहे.
अशोक गेहलोत यांनी ट्विट करून म्हटलं की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आज तुम्ही राजस्थान दौऱ्यावर आहात. मात्र PMO ने कार्यक्रमातून माझे पूर्व नियोजित 3 मिनिटांचे भाषण काढून टाकले आहे. त्यामुळे मी तुमचे भाषणातून स्वागत करू शकणार नाही. त्यामुळे मी ट्विटद्वारे राजस्थानमध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो.
मात्र प्रत्यक्षात आज होत असलेल्या 12 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन आणि पायाभरणी हे राजस्थान सरकार आणि केंद्र यांच्यातील भागीदारीचे परिणाम आहे. या वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रकल्प खर्च 3,689 कोटी रुपये असून, त्यातील 2,213 कोटी रुपये केंद्राचा आणि 1,476 कोटी रुपये राज्य सरकारचे आहे. याबद्दल राज्य सरकारच्या वतीनेही मी सर्वांचे अभिनंदन करतो.
या कार्यक्रमातील माझ्या भाषणातून मी मागण्या करणार होतो, त्या या ट्विटच्या माध्यमातून मांडत आहे. मला आशा आहे की 6 महिन्यांतील 7 व्या दौऱ्यात तुम्ही त्या पूर्ण करण्याचे आश्वासन द्याल.
1. राजस्थानच्या विशेषत: शेखावटीच्या तरुणांच्या मागणीनुसार अग्निवीर योजना मागे घेऊन सैन्यात कायमस्वरूपी भरती सुरू ठेवावी.
2. राज्य सरकारने सर्व सहकारी बँकांतील 21 लाख शेतकऱ्यांचे 15,000 कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज माफ करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे वन टाईम सेटलमेंट प्रस्ताव पाठवला असून, त्यात आम्ही शेतकऱ्यांचा वाटा देऊ. ही मागणी मान्य करावी.
3. राजस्थान विधानसभेने जात जनगणनेचा ठराव मंजूर केला आहे. केंद्र सरकारने विलंब न करता याबाबत निर्णय घ्यावा.
4. महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांमुळे आमच्या तीन जिल्ह्यांमध्ये सुरू होत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांना केंद्र सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. हे संपूर्णपणे राज्याच्या निधीतून बांधले जात आहेत. केंद्र सरकारनेही या तीन आदिवासीबहुल जिल्ह्यांतील वैद्यकीय महाविद्यालयांना ६० टक्के निधी द्यावा.
5. पूर्व राजस्थान कालवा प्रकल्प (ERCP) ला राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पाचा दर्जा देण्यात यावा. मी तुम्हाला विनंती करतो की या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी आणि राज्यातील जनतेला आश्वस्त करावं, असंही गेहलोत यांनी म्हटले आहे.
Shri @ashokgehlot51 Ji, In accordance with protocol, you have been duly invited and your speech was also slotted. But, your office said you will not be able to join. During PM @narendramodi’s previous visits as well you have always been invited and you have also graced those… https://t.co/BHQkHCHJzQ — PMO India (@PMOIndia) July 27, 2023
Shri @ashokgehlot51 Ji,
In accordance with protocol, you have been duly invited and your speech was also slotted. But, your office said you will not be able to join.
During PM @narendramodi’s previous visits as well you have always been invited and you have also graced those… https://t.co/BHQkHCHJzQ
— PMO India (@PMOIndia) July 27, 2023
यावर स्पष्ट शब्दात पंतप्रधान कार्यालयाने खुलासा करून अशोक गेहलोत यांनी कशी कुरापत काढली हेच नमूद केले आहे.
यावर पीएमओने म्हटलं की, अशोक गेहलोतजी, प्रोटोकॉलनुसार, तुम्हाला रितसर निमंत्रित केले आहे. तसेच तुमचे भाषण सुद्धा स्लॉट करण्यात आले आहे. परंतु, तुमच्याच कार्यालयाने सांगितले की, तुम्ही सहभागी होऊ शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधीच्या भेटीप्रमाणेच तुम्हाला यावेळीही आमंत्रित केले गेले आहे. तुमची कार्यक्रमाला उपस्थिती असल्यास आम्हाला आनंदच होईल. आजच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तुमचे स्वागत आहे. विकासकामांच्या फलकावरही तुमचे नाव आहे. नुकत्याच झालेल्या दुखापतीनंतर तुम्हाला कोणतीही शारीरिक अस्वस्थता नसेल तर तुमची उपस्थिती महत्त्वपूर्ण असल्याचेही पीएमओने नमूद केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App