प्रतिनिधी
मुंबई : अजित पवारांनी राष्ट्रवादीकडून भाजपची घरोबा केल्यानंतर शरद पवारांना जेवढे वाईट वाटले नाही तेवढे वाईट उद्धव ठाकरेंना वाटत आहे शरद पवारांच्या समर्थनासाठी ते आपल्या सामनातल्या मुलाखतीतून पुढे आले आहेत. अजितदादांवर त्यांनी जोरदार शरसंधान साधले आहेत सगळं काही काकांकडून घेतल्यावर आपल्यावर अन्याय झाल्याचा टाहो फोडणे ही वाईट गोष्ट आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अजितदादांना सुनावून घेतले. Uddhav thackeray targets ajit pawar over his remarks on sharad pawar’s age
अजित पवारांच्या राजकीय कारकीर्दीत सगळे काही त्यांना शरद पवारांनी दिले. पण शरद पवारांच्या अखेरच्या दिवसांमध्ये त्यांचे वय काढणे ही गोष्ट मला खटकली. तुम्हाला तिकडे स्वार्थासाठी जायचे होते, तर हरकत नाही. पण तसे उघड सांगून जायला हवे होते. कदाचित लोकांनी तुम्हाला तसेच स्वीकारले असते. पण आता लोक स्वीकारणार नाहीत. सगळे काही मिळून अन्याय झाल्याचा टाहो फोडणे अत्यंत वाईटच आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अजितदादांना सुनावले.
अजित पवारांनी विधानसभेत नुकताच एक किस्सा सांगून उद्धव ठाकरेंना अडचणीत आणले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना खासदार गोपाळ शेट्टी यांच्या मतदारसंघात अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभा करायचा होता त्यासाठी एक मोठी मीटिंग घेतली. त्याला देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः उपमुख्यमंत्री म्हणून उपस्थित होतो. पण त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परवानगी दिली नाही, असे अजितदादांनी भर विधानसभेत सूचित केले. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यातील दरी वाढली आहे. ती उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीनंतर आणखी रुंदावली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App