विशेष प्रतिनिधी
जयपूर : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरणाची आकडेवारी अधोरेखित करण्याऐवजी लस पुरवावी असे उपरोधिक आवाहन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले. Ashok Gehlot targets Modi Govt.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने त्यांनी सांगितले की, या लाटेचा फटका लहान मुलांना बसला तर देश त्यांना कधीही माफ करणार नाही. १३० कोटी लोकसंख्येच्या देशात लस लवकर मिळाली नाही तर तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होऊ लागेल. तशा स्थितीत ऑक्सिजन आणि औषधांच्या तुटवड्याची स्थिती दुसऱ्या लाटेपेक्षा आणखी गंभीर होईल. लहान मुलांचा जीव वाचविणे अवघड बनेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लस उत्पादनाला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे होते. आवश्यकता भासल्यास आणखी कंपन्यांना उप्तादनाची परवानगी द्यायला हवी होती आणि कायदा बदलून लसनिर्मितीला प्रोत्साहन द्यायला हवे होते. आकडेवारी बाजूला ठेवून राज्यांसाठी जास्त लशी उपलब्ध केल्या जाव्यात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App