अशोक चव्हाणांचे राज्यसभेतील पहिलेच भाषण गाजले; चारोळीतून विरोधकांवर चढवला हल्ला

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जित पर कभी अहंकार नहीं किया, किसी हारपर कभी रोया नही; लेकिन हर हार के बाद कभी चैनसे बैठा नही! खासदार अशोक चव्हाण यांच्या शेरोशायरीनंतर सभागृहात त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या. राज्यसभेवर निवडणून आल्यानंतर अशोक चव्हाण यांनी सभागृहात केलेले भाषण चांगलेच गाजले. मी काँग्रेसकडून निवडून आलो होतो, त्याचा मला अभिमान असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे. अशोक चव्हाण यांनी अनेक मुद्द्यांवर सभागृहात भाषण केले. मोदी सरकार सत्तेत आले तर संविधान बदलणार असल्याच्या खोट्या बातम्या पेरण्यात आल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. नीट परीक्षेतील गोंधळाच्या मुद्द्यावर देखील चव्हाण यांनी भाष्य केले. आपल्या भाषणाच्या अखेरीस अशोक चव्हाण यांनी चारोळीतून विरोधकांवर हल्ला चढवला.Ashok Chavan’s first speech in the Rajya Sabha became popular; Attack on opponents from Charoli



काँग्रेस पक्ष सोडून भाजप मध्ये दाखल होताच अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले आहे. त्यांची निवड झाल्यानंतर त्यांनी आज राज्यसभेत पहिल्यांदाच जोरदार भाषण केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर त्यांनी धन्यवाद प्रस्तावाच्या बाजूने आपले परखड मत मांडले. या वेळी त्यांनी विरोधी पक्षातील खासदारांच्या प्रश्नांना देखील सडेतोड उत्तरे दिली. सभागृहात नांदेड लोकसभा मतदार संघाची देखील चर्चा झाली होती. त्यावर देखील अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सभापती जगदीप धनखड यांनी सभागृहात करुन दिली ओळख

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या प्रस्तावावर चर्चा असताना खासदार अशोक चव्हाण यांनी देखील या चर्चेत सहभाग घेतला होता. त्याच्या सुरुवातीलाच ओळख करून देताना सभापती जगदीप धनखड यांनी अशोक चव्हाण यांची ओळख करून दिली. अशोक चव्हाण हे लोकसभेचे सदस्य राहिले असून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, दोन वेळा आमदार राहिले असल्याचे त्यांनी संसदेला सांगितले. त्यानंतर अशोक चव्हाण यांचे भाषण झाले. या वेळी मी काँग्रेसमधून जिंकून आलो होतो, याचा मला अभिमान असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

विरोधकांना अशोक चव्हाण यांचे प्रत्युत्तर

सभागृहातील काही सदस्यांना नांदेडमध्ये प्रचंड रुची आहे. नांदेडमध्ये भाजपचा पराभव झाला असल्याचे काही सदस्यांनी म्हटले आहे. ज्या वेळी महाराष्ट्रात कुठेच काँग्रेसला जागा मिळाली नव्हती तेव्हा काँग्रेसला नांदेड आणि हिंगोलीत जागा मिळाली होती. त्या यशात माझा छोटासा वाटा होता. मी जे काही काम केले, ते प्रामाणिकपणे केले असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. तिथून जागा निवडून आणल्या आहेत. काही सदस्य असेही आहेत ज्यांच्या जिल्ह्यात पंचायत समितीचेही सदस्य निवडून आले नाहीत. त्यामुळे मला आता इकचे म्हणायचे आहे की, जित पर कभी अहंकार नहीं किया, किसी हारपर कभी रोया नही, लेकिन हर हार के बाद कभी चैनसे बैठा नही!

Ashok Chavan’s first speech in the Rajya Sabha became popular; Attack on opponents from Charoli

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात