काश्मीरमधील परिस्थिती सुधारत असल्याचे फुटीरतावाद्यांच्या डोळ्यात सलते आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काश्मीरी पंडितांना लक्ष्य करून हिंसाचाराचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते राकेश पंडिता यांच्या हत्येने स्पष्ट झाले आहे. As the situation in Kashmir improves, separatists aim to target Pandits, Rakesh Pandita’s assassination clarifies intentions
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर: काश्मीरमधील परिस्थिती सुधारत असल्याचे फुटीरतावाद्यांच्या डोळ्यात सलते आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काश्मीरी पंडितांना लक्ष्य करून हिंसाचाराचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते राकेश पंडिता यांच्या हत्येने स्पष्ट झाले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचा जनाधार वाढवण्याचा प्रयत्न करणो राकेश पंडिता यांची हत्या करण्यात आली आहे. राकेश पंडिता हे काश्मीरमध्ये पक्षाचं काम पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत होते. पक्षात तरुणांचा समावेश करण्यासाठी त्यांची मोठी भूमिका होती.
फुटीरतावाद्यांना काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडित नकोच आहेत, अशी प्रतिक्रिया पंडिता यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. राकेश पंडित त्रालमध्ये आल्याची माहिती दहशतवाद्यांना दिली गेली असावी. यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली. राकेश पंडिता यांच्या हत्येची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
राकेश पंडिता यांचे मामा राधाकृष्ण रैना यांनी सांगितले की, सीबीआय असो किंवा एआयए राकेश पंडिता यांच्या हत्येची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे. काश्मिर खोºयात अनेकांना काश्मिरी पंडित डोळ्यासमोरही नको आहेत. काश्मिर पंडितांची उपस्थिती त्यांच्या डोळ्यात खुपतेय. म्हणूनच अशा घटना घडत आहेत.
काश्मीर खोऱ्यात तीस वर्षांपूर्वी पंडितांवर मोठे हल्ले झाले होते. विभाजनानंतर काश्मिरी पंडित आणि मुस्लिमांमध्ये बंधुभाव होता; पण १९८०नंतर परिस्थिती बदलत गेली. पाकिस्तानचे पंतप्रधान जनरल झिया यांना या माध्यमातून काश्मीरमध्ये असंतोष पसरवायचा होता. काश्मिरी पंडित त्या वेळी अल्पसंख्य होते. पाच टक्के लोकसंख्येचे काश्मिरी पंडित मोठ्या हुद्द्यावर काम करत होते. त्यामुळे त्याविषयीचा द्वेष तर होताच; पण जोपर्यंत पंडितांना काश्मीरमधून पळवून लावलं जात नाही तोपर्यंत त्यांचा हेतू सफल होणार नव्हता. त्यामुळे या काफिरांना काश्मिरात राहण्याचा अधिकार नाही, अशा वल्गना खुलेआम होऊ लागल्या. त्यातून पंडितांना निर्वासित व्हावे लागले.
काश्मीरमध्ये कलम ३७० हटविल्यानंतर परिस्थिती सुधारत आहे. अनेक काश्मीरी पंडित पुन्हा परतत आहेत. त्यामुळे फुटीरतावाद्यांनी पुन्हा एकदा पंडितांना लक्ष्य करणे सुरू केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App