G20 परिषद यशस्वी होताना रंगली हिंदू धर्माच्या बौद्धिक अपमानाची स्पर्धा!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : G20 शिखर परिषद भारताच्या अध्यक्षतेखाली यशस्वी होताना होत असताना त्याचे वैषम्य वाटून हिंदू धर्माच्या बौद्धिक अपमानाची स्पर्धा देशातच लागली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचे चिरंजीव उदयनिधी यांनी सनातन धर्माच्या अपमानाची सुरुवात केली. त्यांना 2G घोटाळ्यातला आरोपी आणि माजी केंद्रीय मंत्री ए राजा, लालूप्रसादांच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते जगदानंद यांची “साथ” मिळाली. या सर्वांनी मिळून सनातन धर्माला वाटेल तशी नावे ठेवली, पण तरी देखील ज्या पार्श्वभूमीवर त्यांनी सनातन धर्माचा अपमान केला, ती G20 परिषद यशस्वी व्हायची ती झालीच!! त्यात कोणतीही बाधा येऊ शकली नाही. As the G20 conference succeeds, a contest of intellectual insults to Hinduism rages

भारताच्या मुत्सद्देगिरीला यश आले आणि पहिल्याच दिवशी दिल्ली जाहीरनामा यशस्वी देखील झाला. अन्यथा कोणत्याही शहरात अशी आंतरराष्ट्रीय परिषद झाली की सर्वसाधारणपणे संयुक्त वक्तव्यावर अथवा जाहीरनाम्यावर सहसा एकमत होताना दिसत नाही, पण दिल्ली जाहीरनामा भारताच्या यशस्वी मुत्सद्देगिरीमुळे परिषदेच्या पहिल्याच दिवशी मंजूर झाला. यामध्ये युक्रेन युद्धासंदर्भातले मोठे संदर्भ देखील दिले गेले. जो विषय पूर्ण वादग्रस्त ठरून बाली मध्ये टाळला गेला होता, अथवा चटावरच्या श्राद्ध सारखा उरकला गेला होता, तो दिल्लीत “पूर्ण विषय” म्हणून दिल्ली जाहीरनाम्यात स्वीकारला गेला.

इतकेच नाही तर चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला धक्का देणारा भारत – आखाती देश आणि युरोप असा नवीन कनेक्टिव्हिटी करार देखील करण्यात आला. राजनैतिक पातळीवर भारत सरकारचा हा मोठा विजय ठरला. भारताचे नाव इंडिया नसून भारत आहे हे याच G20 परिषदेत विशेषत्वाने अधोरेखित झाले. 9 देशांची जैवइंधन परिषद अस्तित्वात आली. आफ्रिकन युनियनला g20 मध्ये स्थान मिळाले.

भारताच्या राजनैतिक आणि मुत्सद्दी वर्तुळाचे हे मोठे यश साजरे होत असताना दुसरीकडे काही छिद्रान्वेषी बौद्धिकांनी त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. उदयनिधी स्टालिन, ए राजा, जगदानंद यांना दिल्ली आयआयटी मधील विद्यापीठाच्या सह प्राध्यापिका दिव्या द्विवेदी यांची “साथ” मिळाली.

भारत भविष्यामध्ये हिंदू धर्मविरहित असेल असे त्यांनी बौद्धिक दृष्ट्या “जाहीर” केले. कारण त्या दिल्ली आयआयटीमध्ये तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापिका आहेत. भारताचे मूळ नाव भारत या स्वरूपातच g20 परिषदेत झळकल्यानंतर भारत हे नाव आर्यन वर्चस्ववादाचे प्रतीक असल्याचा “जावई शोध” दिव्या द्विवेदी यांनी लावला.

G20 परिषदेत आज ज्या भारताचे प्रतिनिधित्व सुरू आहे, तो फक्त 10 % वरिष्ठ जातींचा भारत आहे. गेली 3000 वर्षे याच वरिष्ठ जाती 90% कनिष्ठ जातींचे शोषण करत आहेत आणि ते स्वतःला आज “भारत” म्हणवून घेत आहेत. पण भविष्यातला भारत हा हिंदू धर्मविरहित भारत असेल, कारण हा हिंदू धर्म भेदभाव करतो. भविष्यातल्या भारतात भेदभाव नसेल, असे दीर्घ वक्तव्य दिव्य द्विवेदी यांनी जी 20 च्या पार्श्वभूमीवर फ्रेंच मीडियाला दिलेल्या मुलाखतीत केले.

यामुळे “इंडिया” आघाडीतल्या हिंदू धर्म द्वेषी नेत्यांना “बौद्धिक बळ” मिळाले. एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक आणि मुत्सद्दी वर्तुळात भारताचा दबदबा तयार होत असताना, दुसरीकडे हिंदू धर्म द्वेषी पुढे येऊन छिद्रान्वेषी वृत्ती दाखवत आहेत, हे त्याचेच एक उदाहरण आहे.

As the G20 conference succeeds, a contest of intellectual insults to Hinduism rages

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात